शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आणि माणसाची सावली दिसेनाशी झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 21:48 IST

अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.

ठळक मुद्देनागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस : पृथ्वीचा कोन साडे २३ अंश कलल्याने ही स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधार असल्याशिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात पण मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.१० ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ नागपूरकरानाच घेता आला. कारण खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ उपराजधानीची स्थिती अनुकूल होती.सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा असतोच. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे दोन दिवस म्हणजे २६ मे आणि १७ जुलै. याचे शास्त्रीय कारणही तसे महत्त्वाचे आहे. रमण विज्ञान केंद्राचे शिक्षक विलास चौधरी यांनी झिरो शॅडो डे चे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अशाचा कोन करीत असते. ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो.रमण विज्ञान केंद्र दरवर्षी झिरो शॅडो दे चे मार्गदर्शक आयोजन करीत असतो मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.नागपुरातच सावली का गायब झाली ?तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की नागपुरात शून्य सावली का झाली. उत्तर आहे... विलास चौधरी यांनी सांगितले, नागपूर शहराचा अक्षांश २१.१७ अंश आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायन करताना २१.१७ अंश असतो तेव्हा नागपुरात सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी १२.१० वाजता सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट २१.१० अंश असल्याने आज शून्य सावली दिवस अनुभवता आला.११५० लोकांनी पाहिले फेसबुक लाईव्हलॉकडाऊन लक्षात घेता रमण विज्ञान केंद्रातर्फे केंद्राच्या फेसबुक पेजवर शून्य सावली दिवस लाईव्ह करण्यात आला. मंगळवारी आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल ११५० च्यावर लोकांनी या क्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. केंद्रात यासाठी व्यवस्था व्यवसथा करण्यात आली होती आणि यावेळी काही लोक उपस्थित होते.

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसnagpurनागपूर