शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अन् नागपूरकरांमुळेच काका झाला स्टार!

By admin | Updated: July 18, 2015 02:48 IST

राजेश खन्ना म्हणजे रसिकांचा आवडता अभिनेता. आनंद सिनेमात त्याच्या खास अंदाजात ‘बाबु मोशाय...’ म्हणणारा राजेश खन्ना आणि त्याचा लाजवाब अभिनय आम्ही कधीच विसरलो नाही.

सुपरस्टार राजेश खन्ना यांची तृतीय पुण्यतिथी : अभिनयाच्या कारकीर्दीला नागपुरातूनच प्रारंभ राजेश पाणूरकर नागपूरराजेश खन्ना म्हणजे रसिकांचा आवडता अभिनेता. आनंद सिनेमात त्याच्या खास अंदाजात ‘बाबु मोशाय...’ म्हणणारा राजेश खन्ना आणि त्याचा लाजवाब अभिनय आम्ही कधीच विसरलो नाही. पण कॅन्सर झालेला आनंद विलक्षण ताकदीने उभा करणारा राजेश खन्ना आता खरेच नाही. आनंद चित्रपटातले हे दृश्य काका हयात नसताना पाहताना मात्र डोळ्यांच्या पापण्या अलगद ओलावतात. आपल्या सशक्त अभिनयाने रसिकांच्या हृदयात हात घालणारा आणि त्यांच्या भावनांना आवाहन करणारा राजेश खन्ना दुसरीकडे ‘किंग आॅफ रोमान्स’ होता. गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुपरस्टार राजेश खन्नाची कारकीर्द मात्र नागपुरातून सुरू झाली. दस्तुरखुद्द राजेश खन्ना यांनीच त्यांच्या आयुष्यात नागपूरचे योगदान खूप मोठे असल्याचे मान्य केले होते. नागपूरला राज्य शासनाच्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. साल १९६७. त्यावेळी एका नाट्य संस्थेकडून एक तरुण कलावंत नाटकासाठी आला. त्याचे नाव होते जतीन खन्ना. जतीन खन्नाबाबत कुणालाही नागपुरात फारसे काही माहीत नव्हते. नाट्य संस्थेचे हे सारे कलावंत नाटक सादर होण्याच्या दोन दिवस आधी आले. त्यावेळी नाटकातील कलावंतांसह मूख्य भूमिकेत असणारा जतीन खन्नाही नागपुरात तब्बल तीन दिवस थांबला होता. नाटकाचे नाव होते ‘मेरे देश के गाव...’. स्पर्धेत हे नाटक सादर करण्यात आले आणि जतीन खन्नाच्या अभिनयाने तत्कालीन नागपूरकर रसिकांना जिंकले. फारसा परिचित नसलेला जतीन खन्ना या स्पर्धेतूनच लोकांच्या समोर आला. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ‘मेरे देश के गाव’ या नाटकाला आणि उत्कृष्ट अभिनयासाठी जतीन खन्नालाही पुरस्कार मिळाला. त्यावेळी रसिकांनी जतीन खन्नाला डोक्यावर घेतले होते. त्यानंतर जतीन खन्ना मुंबईच्या मायानगरीत आला. त्याच्या मामांच्या सांगण्यावरून त्याने राजेश हे नाव धारण केले आणि जतीनचा राजेश खन्ना झाला. त्याच काळात राजेश खन्नाचे आखरी खत, बहारो के सपने आणि राज हे चित्रपट प्रदर्शित झाले आणि राजेश खन्नाच्या प्रेमापोटी नागपूर-विदर्भात हे सिनेमे तुफान चालल्याचा इतिहास आहे. राजेश खन्ना नंतर सुपरस्टार झाला आणि १५ सोलो हिट सिनेमा त्याने दिले पण राजेश खन्नाचे नागपूरशी सातत्याचे ऋणानुबंध राहिले. हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत नागपुरात मिळालेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील पहिला सर्वात मोठा पुरस्कार होता. या पुरस्काराने माझ्यातला आत्मविश्वास दुणावला आणि अभिनयात कारकीर्द करण्याची आपली क्षमता असल्याचे मला जाणवले. त्यामुळे नागपुरातूनच मला प्रेरणा आणि बळ मिळाले. येथूनच माझ्या कारकीर्दीला प्रारंभ झाला आणि नागपूरकरांनीच मला स्टार केले, असे विधान राजेश खन्ना यांनी नागपूरकरांसमोरच केले होते. आता राजेश खन्ना नाही पण या महान अभिनेत्याशी नागपूरकरांचे जवळचे संबंध होते. त्याची आठवण नागपूरकरांच्या मनात कायम आहे. सुपरस्टार आणि खासदार झाल्यावरही राजेश खन्ना नागपूरला विसरला नाही. त्याने त्याला प्रोत्साहन देणाऱ्या येथल्या रसिकांविषयी कायम कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळेच आज त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त राजेश खन्ना यांची आठवण नागपूरकरांना येणे स्वाभाविक आहे.