शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

...तर महाविद्यालयांचे अनुदान बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 1:31 AM

‘नॅक’चे मूल्यांकन करण्यासाठी चालढकल करणाऱ्या महाविद्यालयांना असे करणे महागात पडणार आहे. जर येणाऱ्या  काळात त्यांनी मूल्यांकन केले नाही तर त्यांना मिळणारे अनुदान बंद होऊ शकते. हेच नाही तर तेथे शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीदेखील बंद होऊ शकते. कारवाईपासून वाचण्यासाठी महाविद्यालयांना ‘नॅक’कडे मूल्यांकनासाठी अर्ज करावाच लागणार आहे.

ठळक मुद्दे‘नॅक’ मूल्यांकन करणे अनिवार्य : महाविद्यालयांसाठी ‘रुसा’तर्फे कार्यशाळेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नॅक’चे मूल्यांकन करण्यासाठी चालढकल करणाऱ्या महाविद्यालयांना असे करणे महागात पडणार आहे. जर येणाऱ्या  काळात त्यांनी मूल्यांकन केले नाही तर त्यांना मिळणारे अनुदान बंद होऊ शकते. हेच नाही तर तेथे शिकणाऱ्या  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीदेखील बंद होऊ शकते. कारवाईपासून वाचण्यासाठी महाविद्यालयांना ‘नॅक’कडे मूल्यांकनासाठी अर्ज करावाच लागणार आहे.‘नॅक’ने मूल्यांकनाच्या नियमावलीत बदल केला आहे. ही नियमावली लागू करत असतानाच महाविद्यालयांना मूल्यांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मूल्यांकनाच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटरमध्ये ‘रुसा’तर्फे (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन ‘रुसा’च्या प्रधान सचिव व राज्य प्रकल्प अधिकारी मीता राजीवलोचन यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, विद्यापीठातील ‘रुसा’चे समन्वयक डॉ.मनोज राय, विद्यापीठाच्या ‘आयक्यूएसी’चे संचालक डॉ.सुरेश झाडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे २१८ प्रतिनिधींसमवेत गोंडवाना विद्यापीठातील ३२ महाविद्यालयांचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते.‘नॅक’चे मूल्यांकन केल्यास महाविद्यालयांना फायदाच होणार आहे. हे सर्वांसाठीच अनिवार्य आहे. राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता व पातळी वाढविण्यासाठी महाविद्यालयांना ‘नॅक’चे मूल्यांकन करावेच लागेल, असे मीता राजीवलोचन यांनी सांगितले.कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात ‘रुसा’चे प्रशिक्षक डॉ.एम.आर.कुरुप व दुसऱ्या  सत्रात जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.प्रीती बजाज यांनी महाविद्यालय प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले. सोबतच त्यांच्या प्रश्नांचीदेखील उत्तरे दिली. महाविद्यालयांनी नेमके अर्ज कसे भरावे व इतर तयारी कशी करावी, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठfundsनिधी