शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबात फिरतेय दोन पिल्लांची जखमी वाघीण, वन अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 06:23 IST

वनविभागाची पाळत : पांगडीभोवती वावर

संजय रानडे

नागपूर : मागील डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे लंगडत चालणाऱ्या दोन पिल्ले असणाऱ्या वाघिणीनेताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पांगडी परिसरात पर्यटकांनाही शनिवारी हिरडीनाला नावाने ओळखली जाणारी ही वाघीण दिसली. 

आपल्या अन्य तीन छायाचित्रकार मित्रांसह पांगडी बफर परिसरात सफारीसाठी गेले असता ही वाघीण जवळून पाहिल्याचा दावा वन्यजीव छायाचित्रकार विश्वास उगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तिच्या डाव्या पंजाचे हाड तुटलेले दिसले. चालतानाही तिला बराच त्रास होत होता. आपल्या भक्ष्याला ठार करून ती उभी असतानाच अचानक एक मोठा वाघ आला. मात्र, गंभीर जखमी असूनही आपल्या भक्ष्याचे रक्षण करण्यासाठी तिने वाघाशी बराच संघर्ष केला. ही वाघीण दोन पिल्ले वाढवत आहे, त्यांच्या पोषणासाठी ती पांगडी परिसरातील पाळीव जनावरांनाही मारू शकते. दुखापतीमुळे तिच्या चपळतेवर परिणाम झाला आहे, यामुळे मनुष्य-प्राणी संघर्ष होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक (बफर झोन) कुशाग्र पाठक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या जखमी वाघिणीबद्दल दुजोरा दिला. खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प