शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाखांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षिताने केली किमया

By गणेश हुड | Updated: June 1, 2023 15:28 IST

फळबाग शेतीचे महत्व ओळखून त्यांनी आपल्या ५ एकर शेतात आंबा लागवड केली

नागपूर : तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे हे उच्च शिक्षीत असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. फळबाग शेतीचे महत्व ओळखून त्यांनी आपल्या ५ एकर शेतात आंबा लागवड केली आहे. यातून ते आज वर्षाला १० लाख रुपयाचे उत्पन्न घेत आहेत.

लांजे यांच्याकडे १७ एकर शेती आहे. त्यातील पाच एकरमध्ये ते लंगडा व दशेरी या जातीचे आंबे पिकवितात. याशिवाय त्यांच्या शेतामध्ये चवसा, केशर, फजली, तोतापली, अशी वेगवेगवेगळ्या जातीची जवळपास २२५ आंब्याची झाडे लावली आहेत. कृषी विभागाच्यावतीने आंबा महोत्सवाचे आयोजन जुने प्रशासकीय भवन येथे करण्यात आले. “ विदर्भाचा राजा चांदपूरचा लंगडा” आंबा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा आंबा अतिशय वाजवी दरामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. १५ जूनपर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

उपन्न वाढविण्यासाठी पारंपारिक शेती पद्ध्तीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. अशा पध्दतीने शेतकऱ्यांनी फळबाग शेती करून उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत मजबूत करणे शक्य असल्याचे लांजे म्हणाले.नैसर्गिक पध्दतीने पिकविलेले आंबे त्यांच्या शेतामध्ये आहे. आंब्याला डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोहोर येतो. आंब्याला दोन प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परंतु योग्य पध्दतीने त्यांचे व्यवस्थापन व नियोजन केले तर यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असल्याचे लांजे यांनी सांगितले, यामध्ये प्रामुख्याने तुडतुडा (मॅगो हापर) आणि फळमाशी (फुट फ्ल्याय) या किडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी किटकनाशकांचा वापर करून त्यांचा नायनाट करण्यात येतो.

टॅग्स :SocialसामाजिकMangoआंबाnagpurनागपूर