देशभक्तीच्या मंगलमय वातावरणात निघाली अमृत कलश यात्रा
By मंगेश व्यवहारे | Published: October 20, 2023 02:14 PM2023-10-20T14:14:08+5:302023-10-20T14:24:39+5:30
नागपूरातून अमृत कलश मुंबईला रवाना
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेदवारे शहरातील माती राज्याची राजधानी मुंबई येथे पाठविण्यासाठी संविधान चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत अमृत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी ढोल ताशाच्या गजरात मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मनपाच्या दोन स्वयंसेवकांकडे नागपूर शहराच्या मातीचे कलश सुपूर्द केले.
नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधून संकलित मातीचे कलश सन्मानपूर्वक रथामधून संविधान चौक येथे आणण्यात आले. तेथून महानगरपालिका मुख्यालयात आण्यात आले. दहाही झोनमद्ये नागरिकांनी अर्पित केली माती आणि तांदळाचे मनपा मुख्यालयातील हिरवळीवर एक अमृत कलश तयार करण्यात आले.
नागपूर शहराचे अमृत कलश लवकरच मुंबईला रवाना होणार आहे. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, निगम सचिव प्रफुल्ल फरकासे, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, डॉ. गजेंद्र महल्ले, सदाशिव शेळके, महेश धामेचा, प्रकाश वराडे, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, विजय हुमणे, गणेश राठोड, पुष्पगंधा भगत, साधना सयाम, अजय मानकर, अजय पझारे, डॉ. पीयूष आंबुलकर, श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते.
डॉ. सुनील लहाने यांनी नागपूर शहराच्या मातीचे अमृत कलश प्रतिक तुरुतकाने, शुभम सुपारे यांना सुपूर्द केले. हे दोन्ही स्वयंसेवक हे अमृत कलश घेऊन प्रथम मुंबई आणि तेथून राजधानी दिल्ली येथे जाणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सुरेश बगळे यांनी केले. संचालन मनिष सोनी यांनी केले.