शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विमानतळ राज्य शासनाकडे; ७५ कोटी रुपये देणार

By यदू जोशी | Updated: December 15, 2017 00:57 IST

अमरावती (बेलोरा) येथील विमानतळ आता राज्य शासनाचा उपक्रम असलेली महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) स्वत: चालविणार असून, या विमानतळाच्या विकासासाठी दोन टप्प्यांमध्ये ७५ कोटी रुपये देण्यात येतील.

नागपूर : अमरावती (बेलोरा) येथील विमानतळ आता राज्य शासनाचा उपक्रम असलेली महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) स्वत: चालविणार असून, या विमानतळाच्या विकासासाठी दोन टप्प्यांमध्ये ७५ कोटी रुपये देण्यात येतील. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिर्डी येथील दिमाखदार विमानतळाची उभारणी एमएडीसीने केली. कमी कालावधीत आणि कमी खर्चात हे विमानतळ उभारल्याबद्दल केंद्रीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डयण खात्याने एमएडीसीची प्रशंसा केली होती. आता अमरावतीच्या विमानतळाचा विस्तार करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.पूर्वी अमरावतीचे विमानतळ हे एमआयडीसीकडे होते. २००९ मध्ये ते एमएडीसीकडे हस्तांतरित करण्यात आले. तथापि, हे विमानतळ केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय २०१४ मध्ये करण्यात आला. मात्र, हे विमानतळ आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होणार नसल्याने ते घेण्यास प्राधिकरणाने नकार दिला.धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, आता ती १८५० मीटर इतकी लांब आणि ४५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. टर्मिनल इमारत उभारली जाईल. याशिवाय, फायर स्टेशन, एटीसी टॉवर, अ‍ॅप्रन क्षमतेत वाढ, बडनेरा-यवतमाळ बाह्य रस्ता, विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग ६ यांना जोडणारा चौपदरी रस्ता ही कामे करण्यात येणार आहेत.विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने एमएडीसीला ९८ कोटी रुपये दिले होते. त्यातील ७७.५३ कोटी रुपये भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांवर खर्च झाले. आता नव्याने ७५ कोटी रुपये देण्यात येतील. त्यातील १५ कोटी रुपये चालू आर्थिक वर्षात तर उर्वरित ६० कोटी रुपये पुढील वर्षी दिले जातील.

टॅग्स :Airportविमानतळ