योगेश पांडे ल्ल नागपूर विधानसभा निवडणुकांच्या काळात ‘सोशल मीडिया’वर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. नागपूर शहरातील विद्यमान आमदारांनीदेखील ‘फेसबुक’च्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ प्रचारात आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर दोन वर्षांच्या आतच बहुतांश आमदार ‘आॅफलाईन’ झाले आहेत. काही आमदारांनी तर निवडणुकांनंतर ‘टिष्ट्वटर’, ‘फेसबुक’चा वापरदेखील केलेला नाही. मनपा निवडणुकांची रणधुमाळी काहीच दिवसात सुरू होणार आहे. जनतेशी शक्य त्या माध्यमातून संपर्क वाढवा व पक्षाच्या प्रचार-प्रसाराला लागा असे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात येत आहेत. परंतु आमदारच ‘आॅफलाईन’ असल्यावर कार्यकर्त्यांमध्ये काय संदेश जाईल असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एरवी आमदारांकडून थेट जनसंपर्कावर जोर दिसून यायचा. परंतु बदलत्या काळासोबत संपर्काचा ‘ट्रेन्ड’देखील बदलायला लागला आहे. राज्यातील अनेक आमदार ‘सोशल नेटवर्किंग साईट्स’च्या माध्यमातून थेट जनतेशी संपर्कात राहतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर सर्वात ‘अॅक्टिव्ह’ मानण्यात येतात. एरवी विविध कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांसोबत ‘शाईन’ मारणाऱ्या अनेक आमदारांनी या बाबतीत त्यांच्यापासून काहीच शिकवण घेतली नसल्याचे चित्र आहे. निवडणुकांच्या काळात बऱ्याच आमदारांनी कार्यकर्त्यांना ‘सोशल मीडिया’ हाताळण्याची जबाबदारी दिली होती. काही नेत्यांनी तर चक्क विशेष ‘सेल’देखील स्थापन केला होता. परंतु निवडणुका सरल्या आणि बरेच आमदार या ‘हायटेक’ कट्ट्यापासून दूर झाले. ‘टिष्ट्वटर’च्या टिवटिवाटात मागे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘टिष्ट्वटर’हे एकाच वेळी लाखो ‘नेटीझन्स’पर्यंत पोहोचण्याचे माध्यम झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबतीतदेखील आघाडीवर आहेत. परंतु इतर आमदार मात्र ‘टिष्ट्वटर’वरदेखील माघारलेलेच दिसून येतात. शहरातील बहुतांश आमदारांचे तर ‘टिष्ट्वटर’चे खातेदेखील नाही. उच्चशिक्षित आमदार ‘डिस्कनेक्ट’ ४नागपूर शहरातील काही अपवाद वगळले तर बहुतांश आमदार उच्चशिक्षित आहेत. परंतु ‘फेसबुक’सारख्या ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनसंपर्काच्या बाबतीत हेच आमदार माघारले असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख हे हजारो नागरिकांशी एकाच वेळी संपर्क साधणाऱ्या ‘सोशल मीडिया’वर अजिबात सक्रिय नाहीत. यांचे ‘फेसबुक’वर खाते असले तरी गेल्या दोन वर्षांपासून यावर त्यांच्यापेक्षा कार्यकर्त्यांनीच ‘टाईमलाईन’वर जास्त ‘पोस्ट’ टाकलेल्या आहेत. दुसरीकडे कमी शिक्षण असतानादेखील कृष्णा खोपडे यांनी मात्र ‘सोशल कनेक्ट’च्या बाबतीत बाजी मारली आहे. ते नियमित मतदारसंघाशी निगडीत विविध बातम्या, मुद्यांवरील मत व सणांच्या शुभेच्छा ‘पोस्ट’ करतात.
आमदार आॅफलाईन!
By admin | Updated: August 30, 2016 02:41 IST