लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय पाणीपुरवठा-स्वच्छतामंत्री उमा भारती यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक व सरकार्यवाहांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नवे पदाधिकारीदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही भेट अतिशय गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांचे बंड व कर्नाटकसह इतर राज्यांमधील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व होते.अमित शहा यांचे रविवारी दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. तेथून ते थेट संघ मुख्यालयाकडे रवाना झाले. उमा भारती यादेखील संघ मुख्यालयात पोहोचल्या. या दोघांनीही संघश्रेष्ठींशी चर्चा केली. यावेली नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही.
अमित शहा, उमा भारती संघ मुख्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:31 IST
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय पाणीपुरवठा-स्वच्छतामंत्री उमा भारती यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक व सरकार्यवाहांची भेट घेतली.
अमित शहा, उमा भारती संघ मुख्यालयात
ठळक मुद्देसरसंघचालक, सरकार्यवाहांची घेतली भेटशहा यांची वर्षातील तिसरी भेटविश्व हिंदू परिषदेचे नवे पदाधिकारीदेखील उपस्थित