शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

आंबेडकर-ओवेसींचे नागपुरात शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:32 IST

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि ‘एमआयएम’(आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहदुल मुस्लिमीन)चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे आॅक्टोबरमध्ये नागपुरात एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कस्तूरचंद पार्क येथे ही जाहीर सभा होणार आहे. तारीख अजून निश्चित झाली नसली तरी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देआॅक्टोबरमध्ये जाहीर सभा : बहुजन वंचित आघाडी होणार भक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि ‘एमआयएम’(आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहदुल मुस्लिमीन)चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे आॅक्टोबरमध्ये नागपुरात एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कस्तूरचंद पार्क येथे ही जाहीर सभा होणार आहे. तारीख अजून निश्चित झाली नसली तरी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना व छोट्या पक्षांना सोबत घेऊन भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीमध्ये अनेक सामाजिक संघटना व लहान पक्ष सहभागी आहेत. एआयएमआयएमचे नेते खा. ओवेसी यांनी अलीकडेच बहुजन वंचित आघाडीला समर्थन दिले आहे. त्यामुळे भारिप आणि एमआयएमसारखे दोन महत्त्वाचे पक्ष मिळाल्यास आघाडी आणखी भक्कम होईल.एआयएमआयएमने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांचे सध्या दोन आमदार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान तीन जागा लढवण्याची त्यांची तयारी आहे. भारिप बहुजन महासंघाचीही राज्यात ताकद आहे. अकोला पक्षाचा बालेकिल्ला असला तरी कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. भंडारा-गोंदिया येथे पक्षाचा कुठलाही प्रभाव नसताना लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भारिपच्या नवख्या उमेदवाराने तब्बल ४० हजारावर मते घेतली. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी बहुजन वंचित आघाडीने केली आहे. नागपुरात कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या सभेत प्रकाश आंबेडकर व खा. ओवेसी यांच्यासोबतच अनेक संघटनांचे व पक्षाचे नेतेही राहणार आहेत. ही सभा म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.नागपूरवर फोकसअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता नागपूरवर फोकस करीत पक्षाच्या संघटन बांधणीवर जोर दिला आहे. याअंतर्गत बसपाचे सागर डबरासे यांना पक्षात आणण्यात आले असून त्यांच्यावर महासचिव पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय त्यांना नागपूरचे पक्ष संघटन मजबूत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्यांच्या निर्देशानुसारच भारिप नागपूरची कार्यकारिणी नुकतीच बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी गठित होणार आहे. अनेक कार्यकर्ते व नेते भारिपमध्ये प्रवेश घेत आहेत.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण