शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘आंबेडकर’ हेच बहुजन समाजाला पर्याय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:25 IST

आज जातीयवादी शक्ती या देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाला मिळालेले संविधानिक हक्क हिरावून घेतले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाजासमोर आजच्या घडीला केवळ आणि केवळ अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव पर्याय आहेत. तेव्हा आपसातले सारे मतभेद विसरून त्यांना शक्ती द्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात केले.

ठळक मुद्देकार्यकर्ता मेळावा : भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांचा एकसूर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आज जातीयवादी शक्ती या देशातील लोकशाही नष्ट करू पाहत आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसह एकूणच बहुजन समाजाला मिळालेले संविधानिक हक्क हिरावून घेतले जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी बहुजन समाजासमोर आजच्या घडीला केवळ आणि केवळ अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव पर्याय आहेत. तेव्हा आपसातले सारे मतभेद विसरून त्यांना शक्ती द्या, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाच्या नेत्यांनी शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात केले.भारिप बहुजन महासंघ नागपूर शहर व जिल्हा यांच्यावतीने उंटखाना येथील अजंटा सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पक्षाचे महासचिव अमित भुईगळ होते तर पक्षाचे सल्लागार माजी आमदार हरिभाऊ भदे, कुशल मेश्राम, युसुफ पुंजानी, डॉ. सुरेश रोकडे प्रमुख मार्गदर्शक होते. व्यासपीठावर अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, शहराध्यक्ष विनोद गजभिये, वनमाला उके, मनिषा लोखंडे, राजू मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी पक्षातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मोठ्या संख्येने इतर पक्षातील व सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्यांनी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.अमित भुईगळ आपल्या अध्यक्षीय भाषणात, बहुजन समाजाचे एकमेव नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरी समाजासह एकूणच बहुजन समाजावर जेव्हा-जेव्हा अन्याय अत्याचार झाला, तेव्हा-तेव्हा प्रकाश आंबेडकर धावून आले. रस्त्यावर उतरले. तेव्हा त्यांना साथ द्या. येणाºया निवडणुकीमध्ये सर्व समाजाने आपापले मतभेद विसरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. यापुढे महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुणाचेही सरकार बनणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उपस्थित इतर वक्त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात समाजाने प्रकाश आंबेडकरांमागे एक शक्ती म्हणून उभे राहावे, असे आवाहन केले.प्रास्ताविक सेवक डांगे यांनी केले. संचालन अजय सहारे यांनी केले.नागपुरातही राबवा अकोला पॅटर्नपक्षाचे सल्लागार आणि माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत प्रकाश आंबेडकरांनी अकोला जिल्ह्यात राबवलेला निवडणूक पॅटर्न समजावून सांगितला. यानुसार बहुजन समजाला सत्ता प्राप्त करता येणे शक्य आहे, तेव्हा नागपुरातील कार्यकर्त्यांनी सुद्धा येथे ‘अकोला पॅटर्न’ राबवावा, असे आवाहन केले.

टॅग्स :nagpurनागपूर