शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पावसाळ्यात अंबाझरी तलाव पहिल्यांदाच ओव्हरफ्लो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:48 IST

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्ष बुधवारी सकाळी संपली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरातील नागरिकांनी याचा मनसोक्त आनंद लुटला.

ठळक मुद्देयुवकांनी लुटला मनसोक्त आनंद : सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उशिरा सक्रिय झालेल्या मान्सूनने शहरात होणाऱ्या एकूण पावसाची सरासरी आताच ओलांडली आहे. तोतलाडोह आणि नवेगाव खैरी जलाशयेसुद्धा ओसंडून वाहत आहेत. तरीही अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्ष बुधवारी सकाळी संपली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरातील नागरिकांनी याचा मनसोक्त आनंद लुटला. विशेषत: तरुण आणि मुलांनी ओव्हरफ्लो पॉइंटवर पोहोचून तलावाबाहेर वाहणाऱ्या पाण्यात मोठ्या संख्येने मस्ती केली. पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केवली. सोशल मीडियावर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.मान्सून सक्रिय झाल्याापासून तब्बल तीन महिन्यानंतर अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. दुसरीकडे गोरेवाडा तलावसुद्धा जवळपास भरला आहे. या तलावांमधून पाणीपुरवठा होत नाही. तरीही पर्यटन स्थळ म्हणून हा तलाव शहरातील नागरिकांसाठी प्रसिद्ध आहेत. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. जवळपास तासभर तो सुरु होता. त्यानंतर थोडा ब्रेक घेतल्यावर पुन्हा रात्री २.४५ वाजता पाऊस सुरु झाला. यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरात बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ४८.७ मि.मी. इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण १०५९.७ मि.मी. इतका पाऊस पडलेला आहे. हवामान विभागानुसार नागपूरसह विदर्भातील काही भागामध्ये मागील २४ तासात चांगला पाऊस झाला. चंद्रपूर येथे ४० मि.मी., यवतमाळ १२.८ मि.मी., वर्धा ९ मि.मी., अकोला ६.९ मि.मी., अमरावती ६ मि.मी आणि ब्रह्मपुरी येथे २ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.दुपारी कडक उन्हाने वाढला उकाडामंगळवारी रात्रीपासून सुरु असलेला पाऊस बुधवारी पहाटे थांबला. आकाशात ढग दाटून होते. परंतु दुपारी कडक उन पडल्याने उकाडा जाणवू लागला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आकाशात ढग दाटून राहतील. अधूनमधून पाऊस येत-जात राहील.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावnagpurनागपूरRainपाऊस