शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

नागपुरातील अंबाझरी तलावाकडे पाहुण्या पक्ष्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 13:55 IST

उपराजधानीत स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगत असलेल्या तलावांवर या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. असे असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबाझरी सारख्या मोठ्या तलावावर हे पक्षी मात्र दुर्मिळ झाले आहेत.

ठळक मुद्देस्थानिक पक्ष्यांची संख्याही झाली कमीमासेमारी, प्रदूषित पाणी, असामाजिक तत्त्वांचा वाढता वावरदूषित पाणी थांबायला हवे२६५ पक्ष्यांच्या जाती दिसून येतात

सुमेध वाघमारे

आॅनलाईन लोकमत

नागपूर : उपराजधानीत स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगत असलेल्या तलावांवर या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. असे असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबाझरी सारख्या मोठ्या तलावावर हे पक्षी मात्र दुर्मिळ झाले आहेत. तलावावर मोठ्या प्रमाणात होत असलेली मासेमारी, तलावाचे दूषित होत असलेले पाणी, पाण्यातील आॅक्सिजनचे कमी झालेले प्रमाण, पक्ष्यांची शिकार व असामाजिक तत्त्वांचा वावर हे यामागे कारण असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.शहराचे हृदय असलेला अंबाझरी तलाव अद्यापही नैसर्गिक साधनसंपत्तीने वेढला आहे. मात्र याकडे शासनाचे लक्ष नाही. पैसे कमाविण्या पुरताच या तलावाचा विचार होत आहे. लाखो रुपयाच्या कंत्राटीवर मासेमारीसाठी हा तलाव देण्यात आल्याने या तलावाशी जुळून असलेली नैसर्गिक संपत्तीसह स्थानिक पक्षी, स्थानांतरित पक्षी दिसेनासे झाले आहे. दुसरीकडे तलावाचे पाणी दूषित होत असताना तातडीने उपाययोजना नाहीत. हा तलाव पश्चिमात्य देशात असता तर या तलावाला स्वर्गाचे रूप प्राप्त झाले असते, असे मत पक्षी निरीक्षक व्यक्त करीत आहे.अंबाझरी तलावर पूर्वी स्थलांतरित पक्षी पट्टकदम्ब (बारहेडेड गूज) रेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड हे अडीचशे - ते चारशेच्या संख्येत दिसायचे ते आता फार कमी दिसतात. रशियातील आमूर पर्वताचा रहिवासी असलेला ‘आमूर फाल्कन’ हा ससाण्याच्या प्रकारातील पक्षी, युरोपवरून येणारा ‘लेसर सॅण्ड प्लॅवर’, ‘कलहंस’ (ग्रेलॅग गुज), दुर्मिळ तुर्रेवाला, काळे करकोचे, ब्लॅक हेडड आयबीस, युरोपचा गरुड आॅस्प्रे, स्पॉट व्हिल, इझंट टेल्ड जकाना, टपस्टेड डक, गार्जीनी, नॉदर्न सॉलर, कॉमन टिल, युरेशीयन व्हीसन, मल्हार्ड आदी पक्ष्यांचे थवेही दिसून येत नाही. अचानक या पक्ष्यांची कमी झालेली संख्या विचार करायला लावणारी आहे. सध्या या तलावावर मासेमारीसाठी कोलकातावरून १५च्यावर लोक आले आहेत. त्यांनी तलावाशेजारी झोपड्या बांधल्या आहेत.त्यांच्या सोबत सात-आठ होड्याही आहेत. त्यांचा संपूर्ण पसरा काठावर पसरला असून याचा परिणाम, पक्ष्यांवर होत आहे.

मासेमारीचा परिणाम पक्ष्यांवरपक्षी निरीक्षक डॉ. अनिल पिंपळापुरे म्हणाले, अंबाझरी तलावावर मोठ्या संख्येत मासेमारी होते. तलावाच्या बहुतांश भागात मासेमाºयांचे जाळे पसरुन राहते. स्थालांतरीत पक्षी येणे आणि यांच्या मासेमारीचा हंगाम सुरू होणे हे एकाचवेळी होते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मासेमारीचे कंत्राट दिल्याने मोजक्याच जातीच्या मोठे मासे तयार होतात. यामुळे पक्षांचे खाद्य असलेले छोटे मासे कमी होतात. या सर्वांचा प्रभाव स्थलांतरीत पक्ष्यांवर होतो. दूषित पाणी हेही एक कारण आहे. यावर उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे.

२६५ पक्ष्यांच्या जाती दिसून येतातमानद वन्यजीव रक्षक व पक्षी निरीक्षक कुंदन हाते म्हणाले, अंबाझरी तलावात नाल्याचे पाणी मिसळत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाणही कमी झालेले आहे. परिणामी, स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे, हे वास्तव आहे. परंतु स्थानिक पक्ष्यांची संख्या अद्यापही कायम आहे. नागपुरात साधारण ३२५ विविध पक्ष्यांच्या जाती आढळून येतात त्यातील २६५ पक्ष्यांच्या जाती एकट्या अंबाझरी तलावाच्या परिसरात दिसून येतात. ही एक मोठी संख्या आहे. यामुळे तलावाचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

दूषित पाणी थांबायला हवेडॉ. बहार बाविस्कर म्हणाले, अंबाझरी तलावात दूषित पाणी मिसळत असल्याने पाण्यातील आॅक्सिजनची पातळी खूपच घसरली आहे. याचा परिणाम माशांवर होत आहे. पाणवनस्पतीही कमी झालेल्या आहेत. एकूणच या सर्वांचा परिणाम पक्ष्यांवर पडला आहे.

टॅग्स :forestजंगलbirds sanctuaryपक्षी अभयारण्य