शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील पोलीस कर्मचाऱयांना  मिळणार आहारभत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 19:09 IST

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आयुक्तालयांतर्गत तसेच काही जिल्ह्यात आठ तास कर्तव्य प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २४ तासाच्या कालावधीत सतत १० तासांच्यावर बंदोबस्त ड्युटी किंवा इतर कामासाठी हजर राहावे लागल्यास संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांना अतिकालिक(आहार)भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देविधान परिषद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आयुक्तालयांतर्गत तसेच काही जिल्ह्यात आठ तास कर्तव्य प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २४ तासाच्या कालावधीत सतत १० तासांच्यावर बंदोबस्त ड्युटी किंवा इतर कामासाठी हजर राहावे लागल्यास संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱयांना अतिकालिक(आहार)भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, फोटोग्राफर यांना प्रतिमाह १५०० रुपये तर पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई आदींना प्रतिमाह १३५० रुपयेप्रमाणे १ डिसेंबर २०१७ पासून आहारभत्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या साप्ताहिक सुटी अतिशय महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त रद्द करण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. साप्ताहिक सुटी रद्द केल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास  साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात एक दिवसाचे वेतन व दैनिक भत्ता म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहे.पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिताण येऊ नये याकरिता पोलीस मुख्यालयात ताणतणाव मुक्तता शिबिरे घेतली जातात. तज्ज्ञांकडून योगाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच पोलीस कर्मचाकर्मचाऱ्यांना स्वमालकीची घरे विकत घेता यावीत यासाठी घर बांधकाम अग्रीम मंजूर करण्यात येते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन