शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यवसायाला परवानगी, पण संघर्ष कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:58 IST

राज्य सरकारने २८ जूनपासून सलून व्यवसाय सुरू करण्याला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र त्यातील अटी आणि यापूर्वीच्या आंदोलनातील आर्थिक पॅकेजच्या मागण्यांवरून सलून व्यावसायिकांचा संघर्ष कायमच राहणार, अशी चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारने २८ जूनपासून सलून व्यवसाय सुरू करण्याला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र त्यातील अटी आणि यापूर्वीच्या आंदोलनातील आर्थिक पॅकेजच्या मागण्यांवरून सलून व्यावसायिकांचा संघर्ष कायमच राहणार, अशी चिन्हे आहेत.राज्य सरकारने नियम व अटींसह व्यवसाय सुरू करण्याला परवानगी दिली आहे. यात फक्त कटिंग करता येईल, दाढी करण्याला परवानगी नाही. असे आढळल्यास १० हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे तसेच स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्याही सूचना आहेत. स्वच्छतच्या नियमांचे पालन करण्याची दुकानदारांची तयारी असली तरी, दाढी करण्याला परवानगी देण्याची मागणी कायम आहे. लॉकडाऊनच्या काळात तीन महिने व्यवसाय बंद होता. अनेकांवर कर्ज, दुुकान भाडे आणि वीज बिल थकले आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेजची मागणी यापूर्वीच्या आंदोलनातून करण्यात आली होती. मात्र सरकारने दुकानांवरील निर्बंध हटविताना अन्य मागण्यांबद्दल कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे सलून कारागीर दुकानदार वर्गामध्ये रोष कायमच आहे.आर्थिक पॅकेजच्या निर्णयापर्यंत संघर्षस्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करायची असल्याने कटिंगच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेने २६ जूनच्या बैठकीत नोंदविले. कोरोनाची स्थिती संपेपर्यंत कटिंगचा दर १५० रुपये ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सलून दुकानदारांना आर्थिक मदतीचे पॅकेज आणि आत्महत्या केलेल्या समाजबांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयाच्या मदतीची मागणी करून आर्थिक पॅकेजचा निर्णय होइपर्यंत संघर्ष कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.- तर ५ जुलैनंतर आंदोलनसरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करून ताबडतोब मदत न केल्यास ५ जुलैनंतर आंदोलन उभारण्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर आणि युवाध्यक्ष अमोल तळखंडे यांनी दिला. तपस्या विद्या मंदिर सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळ, केस कर्तनालय सलून कारागीर आणि नागपूर युवा संघटनेची सभा सुरेश चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष विजय वाटकर आदींच्या उपस्थितीत झाली. यावेळी हा इशारा देण्यात आला.सरकारकडून अपेक्षाभंग : धनराज वलुकारआर्थिक पॅकेजसोबतच सरकार दुकाने उघडण्यास परवानगी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने पॅकेज जाहीर केले नाही, सोबत फक्त केस कापण्याच्या अटीवर व्यवसायाला परवानगी दिली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या सलून दुकानदार वर्गावर हा अन्याय असून सरकारकडून अपेक्षाभंग झाला असल्याचे मत नाभिक एकता मंचचे केद्रीय अध्यक्ष धनराज वलुकार यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर