शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात करण्याची परवानगी द्या, अन्यथा जीवन उद्ध्वस्त होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:53 IST

Nagpur : बलात्कार पीडित बालिकेची हायकोर्टाला विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला जिल्ह्यामधील बाळापूर येथील बलात्कार पीडित बालिकेने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी गर्भपात करणे आवश्यक आहे, असे तिने याचिकेत नमूद केले आहे.

पीडित बालिका केवळ १२ वर्षे वयाची असून आठव्या वर्गात शिकत आहे. ती आई, बाबा व दोन मोठ्या बहिणींसोबत राहते. एका जवळच्या नातेवाइकाचे घर तिच्या शेजारी आहे. त्या नराधम नातेवाइकाने पीडित बालिकेवर २०२४ मध्ये वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. तिच्या गर्भात सध्या २८ आठवड्यांचे बाळ आहे. 

आरोपीने बलात्कार केल्यानंतर ती खूप घाबरली होती. त्यामुळे तिने कोणालाही याची माहिती दिली नाही. दरम्यान, तब्येत खराब झाल्यामुळे ती गर्भवती असल्याचे समजले. मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध ५ जून २०२५ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला अटकही झाली आहे.

वैद्यकीय मंडळाचा अहवाल मागितलाया प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने पीडित बालिकेची आरोग्य तपासणी करण्यासाठी तातडीने वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले. तसेच, वैद्यकीय मंडळाने गर्भपातासंदर्भात मंगळवारीच अहवाल द्यावा, असे सांगितले. बालिकेच्यावतीने अॅड. सोनिया गजभिये यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय