शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कथित अर्बन नक्षलवादी रेजाझची मैत्रीण शिक्षणातून सहा महिन्यांकरिता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:49 IST

Nagpur : सिम्बायोसिस विद्यापीठाच्या चौकशीमध्ये आढळली दोषी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमधील कथित अर्बन नक्षलवादी व मुक्त पत्रकार रेजाझ सिद्दीक (वय २६) याच्या नागपूर येथील मैत्रिणीला सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने सर्व शैक्षणिक व अशैक्षणिक उपक्रमांतून सहा महिन्यांकरिता निलंबित केले आहे. ती शिस्तभंगाच्या चौकशीमध्ये दोषी आढळून आली आहे. विद्यापीठाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

मैत्रीण सिम्बायोसिस विद्यापीठातील बी.ए.एलएल.बी. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती लकडगंज पोलिसांना गेल्या ८ मे रोजी मारवाडी चौकातील हॉटेल प्राइमच्या खोलीमध्ये रेजाझसोबत मिळून आली होती. रेजाझने सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर व भारतीय सैन्यावर टीका केली होती, तेव्हापासून पोलिस यंत्रणा त्याच्या मागावर होती. 

पोलिसांना रेजाझच्या घरी नक्षलवादी व फुटीरतावाद्यांशी संबंधित कागदपत्रे आणि नक्षलवाद्यांसाठी आर्थिक मदत गोळा केल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याचे अनेक मोठ्या नक्षलवादी नेत्यांशी आणि समर्थकांशी संबंध आहेत. तो गेल्या अनेक वर्षापासून अर्बन नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी नागपूरला येत होता.

याचिका घेतली मागे

  • सिम्बायोसिस विद्यापीठाने गेल्या १० मे रोजी रेजाझच्या मैत्रिणीला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते. त्यामुळे मैत्रिणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • त्यानंतर विद्यापीठाने न्यायालयात हजर 3 होऊन चौकशी २५ मेपर्यंत पूर्ण केली जाईल आणि चौकशीमध्ये मैत्रीण निर्दोष आढळून आल्यास शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तिची विशेष परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही दिली होती.
  • आता अंतिम कारवाईनंतर मैत्रिणीने विद्यापीठातील शिस्तपालन अपिलीय समितीकडे अपील दाखल केले आहे. त्यामुळे तिने मंगळवारी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली.
टॅग्स :nagpurनागपूर