शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

रेल्वे स्थानकावर कथित दहशतवादी आरडीएसक्ससह जेरबंद; पोलिसांची मॉकड्रील

By नरेश डोंगरे | Updated: January 16, 2024 19:59 IST

आकस्मिक स्थितीचा सामना करण्यासाठी केली चाचपणी

नागपूर : मोठ्या प्रमाणात आरडीएक्स घेऊन घातपात घडविण्यासाठी निघालेल्या तीन कथित दहशतवाद्यांना मंगळवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानक परिसरात जेरबंद करण्यात आले. आणिबाणीची स्थिती निर्माण झाल्यास रेल्वे पोलिसांची आणि रेल्वे सुरक्षा दलाची काय तयारी आहे, ते तपासण्यासाठी मंगळवारी नागपूर रेल्वे स्थानकावर रंगित तालिम (मॉक ड्रील) घेण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी ही नाट्यमय घडामोड घडवून आणण्यात आली.

२२ जानेवारीला अयोध्येत मोठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर चार दिवसांनी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे. अशात समाजकंटकाकडून रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाडीत कोणती घातपाताची घटना घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास रेल्वे पोलीस आणि सुरक्षा दल किती तत्पर आहे, ते बघण्यासाठी या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, तीन संशयीत दहशतवादी मोठ्या प्रमाणात स्फोटके (आरडीएक्स) घेऊन रेल्वे स्थानक परिसरात शिरल्याचा कॉल देण्यात आला. तो ऐकताच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), आरोग्य विभाग,अग्निशमन दल असे एकूण १५ अधिकारी आणि ६२ कर्मचारी आणि प्रिन्स, मार्शल आणि टायगर या श्वानाच्या मदतीने रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर धडकले. जवळच्या गार्ड लॉबीत कथित दहशतवादी वावरत असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरक्षा दलाने धावपळ सुरू केली. सायंकाळी ४.१५ वाजता सुरू झालेल्या या रंगित तालिमेत फलाटा जवळच्या गार्ड लॉबीत कथित दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आरडीएक्सही जप्त करण्यात आले.अन् प्रवाशांचा जीव भांड्यात पडलासुमारे दीड तास ही नाट्यमय घडामोड सुरू होती. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये प्रारंभी घबराट निर्माण झाली होती. त्यांना आकस्मिक संकटाला सामोरे जाण्यासाठीची तयारी तपासण्यासाठी ही रंगित तालिम असल्याचे कळाल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.