शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सीच्या कथित प्रमुखाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:14 IST

क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेच्या उपराजधानीत कथित कार्यालय प्रमुखाला धंतोली पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या उत्तर प्रदेशातील साथीदाराला पोलिसांनी नागपुरात बोलावून घेतले आहे. दरम्यान, कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे.

ठळक मुद्देतपास यंत्रणेच्या लोगोचा गैरवापर : कारवरील नेमप्लेट काढली, जामिनावर सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी (सीआयए) नामक खासगी संस्थेच्या उपराजधानीत कथित कार्यालय प्रमुखाला धंतोली पोलिसांनी आज अटक केली. त्याच्या उत्तर प्रदेशातील साथीदाराला पोलिसांनी नागपुरात बोलावून घेतले आहे. दरम्यान, कार्यालय उघडून गुप्तचर यंत्रणेच्या थाटात विविध प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे.अजनी (चुना भट्टी) जवळच्या पूर्व समर्थनगरात एफसीआय गोदाम असून, या गोदामाजवळच्या एका इमारतीत १४ फेब्रुवारीला यवतमाळ येथील नरेश पालारपवार नामक व्यक्तीने सीआयएचे कार्यालय थाटले. त्याच्या कार्यालयाच्या आतमधील साजसज्जा गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयासारखी केली. दर्शनी भागात एक वायरलेस सेट (बंद पडलेला) ठेवला. तर, कार्यालयाच्या बाहेर पालारपवार याची एमएच २९ / एडी ४६९६ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार उभी राहायची. तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्याच्या कारवर असावे तसे एरियलही पालारपवारने आपल्या कारवर लावले. एवढेच नव्हे तर ‘स्टेट डायरेक्टर महाराष्ट्र क्राईम इन्व्हेस्टीगेशन एजन्सी’ अशी नेमप्लेटही कारवर लावली. समोर सीआयएचा झेंडा होता. एकूणच तपास यंत्रणेतील मोठ्या अधिकाऱ्याची वाटावी तशी ही कार होती. पालारपवारने १६ फेब्रुवारीपासून तेथे विविध प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रारी घेणे सुरू केल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळाले. त्यावरून गुन्हे शाखा आणि धंतोली पोलिसांचे पथक शुक्रवारी दुपारी या कार्यालयात धडकले. कार्यालयातील तामझाम पाहून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तेथील कागदपत्रे जप्त करून पालारपवारला त्याच्या कारसह धंतोली ठाण्यात नेले. तेथे त्याची उशिरा रात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली. सीआयएचा कथित कार्यालय प्रमुख नरेश पालारपवारला विचारणा केली असता त्याने आपण सामाजिक दायित्वाच्या भावनेने विविध प्रकरणाची चौकशी करणार होतो, असे सांगितले. शनिवारी सकाळी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याची सूचना करून धंतोली पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री सोडून दिले. आज सकाळपासून पुन्हा या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपास यंत्रणेच्या लोगोचा, झेंड्याचा गैरवापर केल्याचे सांगून धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस यांनी पालारपवार आणि त्याच्या सीआयएच्या कथित प्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल केला. काही वेळेनंतर पालारपवारला जामीन देण्यात आला.प्रतापसिंगलाही अटक करणारसीआयएचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील गौंडा जिल्ह्यात आहे. प्रताप सिंग नामक व्यक्ती या संस्थेचा कथित प्रमुख असल्याचे स्पष्ट झाल्याने धंतोली पोलिसांनी त्याच्यासोबत संपर्क करून त्याला मूळ कागदपत्रांसह नागपुरात येण्यास सांगितले. सिंग मंगळवारी नागपुरात येणार असून, त्याला या गुन्ह्यात अटक केली जाणार असल्याचे धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस यांनी लोकमतला सांगितले.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक