शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डीतील खुनाच्या तीनही आरोपींना अटक, दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश

By दयानंद पाईकराव | Updated: April 8, 2023 16:27 IST

क्षुल्लक कारणावरून केला होता खून

नागपूर : ‘हमारे एरीया मे क्यु रुके हो’ असे म्हणून मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या युवकावर चाकूने वार करून त्याचा खून करणाऱ्या तीन आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली असून यात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.

अनिश उर्फ डिंपी संजय हिरणवार (२१, गवळीपुरा, धरमपेठ) आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. २६ मार्चला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास ईश्वर रामचंद्र बोरकर (२३, दोपटाळा कॉलनी, राजुरा, चंद्रपूर) हा युवक आपले मित्र भोला परचाके, रोशन साकीनाला, आकाश वाघमारे यांच्यासोबत गप्पा मारत भोले पेट्रोल पंपाजवळील जलप्रदाय विभागाच्या कार्यालयासमोर उभे होते. तेवढ्यात स्कुटीवर तीन आरोपी तेथे आले. त्यांनी ‘यहा क्यु रुके हो’ असे म्हटले. त्यांच्यात वाद होऊन आरोपींनी ईश्वर बोरकर याच्यावर चाकुने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. ईश्वरच्या शरीरातून अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान ५ एप्रिलला सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला होता. दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहितीवरून व तांत्रीक मदतीने पोलिसांना आरोपी केळवद टोलनाका परिसर सावनेर येथे असल्याचे समजले. सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कदम आणि डीबी पथक रवाना करण्यात आले. पथकाने सापळा रचून आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. किरकोळ वादातून खून केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर