शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

राज्यातील सर्वच धरणात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:59 AM

देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प गोरेवाडा येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवरच राज्यातील सर्वच धरणांमध्ये तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला मानस : सौरऊर्जेतून दूर होईल विद्युत ऊर्जेचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प गोरेवाडा येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवरच राज्यातील सर्वच धरणांमध्ये तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.राज्यात विद्युत निर्मितीला मोठा तोटा होत असून हा तोटा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा तोटा तोपर्यंत नियंत्रणात येणे आवश्यक आहे. असे झाले तरच राज्य खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर जाईल. विद्युत निर्मितीतून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सौरऊर्जा निर्मिती हा एक उत्तम पर्याय आहे, असे बावनकुळे म्हणाले. चंद्रपुरातील इराई धरण आणि उजनी धरणावर असे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी काळात कचऱ्यापासूनदेखील ऊर्जानिर्मिती करण्याचा मानस असून ‘डम्पिंग यार्ड’च्या ठिकाणी त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण नागपूर शहरात २४ बाय ७ पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेदेखील बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर