शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात बाल्या गावंडे खुनातील सर्व नऊ आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:48 IST

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कुख्यात बाल्या गावंडे याच्या खुनातील सर्व नऊ आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : सबळ पुराव्यांअभावी आरोपींना संशयाचा लाभ

आॅनलाईन लोकमतनागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कुख्यात बाल्या गावंडे याच्या खुनातील सर्व नऊ आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली.योगेश श्यामराव कुंभारे, राजकुमार यादव, प्रशांत श्रीराम बोकडे, शुभम जनकलाल धनोरे, गंगाबाई ऊर्फ पिंकी योगेश कुंभारे, जयभारत जयहिंद काळे , महेश रमेश रसाळ , नवीन चंद्रशेखर ताजनेकर आणि कुख्यात संतोष आंबेकरचा नातेवाईक नीतेश पुरुषोत्तम माने, अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात संतोष आंबेकर हाही आरोपी आहे. तो फरार आहे. तो अटक होताच त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालणार आहे. रवींद्र ऊर्फ बाल्या गोविंद गावंडे (४०) रा. संघ बिल्डिंगमागे, असे मृताचे नाव होते.२२ आणि २३ जानेवारी २०१७ च्या रात्री कळमना गावातील शिवशक्ती बारमागे बाल्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. मृताची पत्नी जयश्री रवींद्र गावंडे हिच्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.बाल्याच्या खुनाची हकीकत अशी, बाल्या हा आरोपी योगेश सावजीचा मित्र होता. योगेशने बाल्याला आपल्या संत तुकारामनगर येथील घरी जेवणाच्या कार्यक्रमासाठी बोलावले होते. त्यामुळे बाल्या हा आपली पत्नी जयश्री, मुलगी, मित्र प्रशांत पांडे आणि त्याच्या मुलीला घेऊन जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर जयश्री ही मुलीला घेऊन आपल्या घरी परत गेली होती. त्यानंतर योगेश सावजी आणि त्याच्या साथीदारांनी सशस्त्र हल्ला करून बाल्याचा निर्घृण खून केला होता.२०१३ मध्ये बडकस चौक महाल येथील जगदीश घायडे यांचा ११०० चौरस फुटाचा वादग्रस्त भूखंड जय काळे, नवीन ताजनेकर आणि महेश रसाळ यांनी संतोष आंबेकर याच्या म्हणण्यावरून विकत घेतला होता. हा भूखंड त्यांनी महाल येथील इंद्रायणी साडी सेंटरचा मालक वैभव खोबरागडे याला ८० लाख रुपयात विकला होता. बाल्या हा या सौद्यातील २० लाख रुपये मागून वारंवार काळेला जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे कट रचून बाल्याचा खून करण्यात आला होता. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. के. तिवारी, अ‍ॅड. पारिजात पांडे तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अभय जिकार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर