शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अ.भा. काँग्रेस समितीवर घारड, तायवाडे, भोयर, राऊत, सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:49 IST

प्रदेश काँग्रेसने नागपुरातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना प्रमोशन दिले आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेले अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, सुरेश भोयर, कुंदा राऊत व अभिजित सपकाळ यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देवासनिक, पांडे, मुत्तेमवार यांचाही समावेश : अनिस अहमद यांनाही ‘स्वीकृती’

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रदेश काँग्रेसने नागपुरातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना प्रमोशन दिले आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेले अनंतराव घारड, बबनराव तायवाडे, सुरेश भोयर, कुंदा राऊत व अभिजित सपकाळ यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हे नेते अ.भा. काँग्रेस समितीच्या पासवर सहभागी झाले होते.नागपूर शहरात पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे नागपुरातील नेत्यांना इतर जिल्ह्यातील ब्लॉकमधून प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले होते. यात अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह अनंतराव घारड, डॉ. बबनराव तायवाडे, अभिजित सपकाळ आदींचा समावेश होता. तर नागपूर ग्रामीणमधून महासचिव मुकुल वासनिक, कुंदा राऊत, सुरेश भोयर आदींची प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेल्या सदस्यांपैकी निवडक नावे अ.भा. काँग्रेस समितीवर पाठविली जातात. पक्षातर्फे अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक, महासचिव अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार या ज्येष्ठ नेत्यांना अपेक्षेनुसार अ.भा. काँग्रेस समितीवर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री अनिस अहमद यांनाप्रदेश काँग्रेसवर स्वीकृत सदस्य म्हणून स्थान देण्यात आले व त्यांचीही अ.भा. काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षातर्फे एकीकडे ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखण्यात आला तर दुसरीकडे पक्षासाठी झटणाºया दुसºया फळीतील व युवा नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. अनंतराव घारड व डॉ. बबनराव तायवाडे यांना केंद्रात संधी देऊन चव्हाण यांनी निष्ठेचे बक्षीस दिले आहे. प्रदेश काँग्रेसच्या डिजिटल सेलचे अध्यक्ष असलेले अभिजित सपकाळ, रामटेक लोकसभा युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनाही केंद्रीय समितीवर प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राऊत व भोयर यांच्या नियुक्तीत प्रदेश काँग्रेससह मुकुल वासनिक यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती आहे.विरोधी गटाला संधी नाही- प्रदेश काँग्रेसमधून अ.भा. काँग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आलेले दुसºया फळीतील सर्वच नेते हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विश्वासातील आहेत. चव्हाण यांनी आपल्या खंदे समर्थकांनाच दिल्लीत पाठविल्याचे यावरून स्पष्ट होते. विरोधात दंड थोपटणाºया गटाला सपशेल दूर सारण्यात आले आहे. यामुळे विरोधी गटातील नेत्यांची नाराजी आणखीनच वाढली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर