शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

न्या. शरद बोबडे यांच्या शालिन व्यक्तिमत्त्वाने सर्वच प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:13 IST

न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल यासाठी अगदी हायकोर्टाचे न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होईपर्यंत कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावली.

ठळक मुद्देसरन्यायाधीशांना स्वत:च्या महाविद्यालयाबद्दल प्रचंड आत्मियताविविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांशी कायम संवाद

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ साली वकिलीची पदवी घेऊन बाहेर पडलेला एक विद्यार्थी एक दिवस देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर जाऊन विराजमान होईल, अशी कल्पनाही त्यावेळी कुणी केली नसेल. मात्र न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या रूपाने हा सर्वोच्च सन्मान या महाविद्यालयाला मिळाला. याचा सार्थ अभिमान महाविद्यालयातील प्रत्येक चेहऱ्यावर झळकतो. विधी महाविद्यालयाला जसा या विद्यार्थ्याचा अभिमान आहे तेवढीच आत्मीयता या विद्यार्थ्यालाही त्याच्या महाविद्यालयाबद्दल आहे. म्हणूनच न्या. बोबडे यांनी या महाविद्यालयाशी संवाद कायम ठेवला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल यासाठी अगदी हायकोर्टाचे न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होईपर्यंत कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावली.विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांनी कॉलेजच्या कार्यक्रमात येणाºया या ‘आपल्या’ पाहुण्याच्या आठवणी सांगितल्या. नागपूर हायकोर्टाचे न्यायमूर्ती असताना २००४ ते २०११ पर्यंत विविध कार्यक्रमात ते उपस्थित झाले. जस्टा काजा महोत्सवातील प्रमुख पाहुणे म्हणून किंवा मुट कोर्ट स्पर्धेत न्यायाधीश म्हणून दिलेली भूमिका त्यांनी पार पाडली. पुढे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर २०१६ च्या १४ व्या जस्टा काजा महोत्सवातही ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाय.के. सबरवाल हे सुद्धा उपस्थित होते. न्या. बोबडे विद्यार्थी म्हणून येथे असताना अनेक गोष्टी जुन्या परिचितांकडून ऐकल्या होत्या. आजोबा व वडील वकील असल्याने कुटुंबातून मिळालेला न्यायसेवेचा वारसा त्यांच्यात होता. त्यांच्यातील कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे त्याला अधिकच झळाळी होती. ते बुद्धिमान होते तसेच कॉलेजच्या प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे सहभागी असण्याचे व तरीही सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहण्याचे अनेक किस्से आम्ही ऐकत होतो. कार्यक्रमादरम्यान त्यांच्याशी संवाद आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामधून त्यांच्यातील व्यक्तित्त्वाचे दर्शन झाले.आमच्यासाठी आनंददायी क्षणन्या. शरद बोबडे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय शालिन आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडत होती. विद्यार्थी त्यांच्याशी बोलण्यासाठी, हस्तांदोलनासाठी पुढे येत होते. तेही हसतमुखाने हा आदर स्वीकारत होते. यावेळी बोलताना ते विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनुभव सांगत. वकिलीच्या पेशात यशस्वी होण्यासाठी शिस्तीचा मार्ग त्यांनी सांगितला. या क्षेत्रातील आव्हाने आणि त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांच्या या शालिन व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही विद्यार्थ्यांवर आहे. मीही या कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि आज प्राचार्य म्हणून सेवारत आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचा एक विद्यार्थी देशाचा सरन्यायाधीश होतो आहे हा आमच्यासाठी सर्वोच्च अभिमानाचा क्षण असल्याची भावना डॉ. कोमावार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र