शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूअड्डा

By admin | Updated: August 4, 2015 03:09 IST

अजनी येथील सेंट्रल रेल्वेच्या शासकीय क्वॉर्टरमध्ये खुलेआम दारू अड्डा चालविला जात आहे. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)

योगेंद्र शंभरकर ल्ल नागपूरअजनी येथील सेंट्रल रेल्वेच्या शासकीय क्वॉर्टरमध्ये खुलेआम दारू अड्डा चालविला जात आहे. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) ठाण्यापासून केवळ काही अंतरावर हा अड्डा सुरू आहे. या कॉलनीतील तरुणांसह परिसरातील धंतोली, मेडिकल चौक, चुना भट्टी आदी परिसरातील ग्राहकही येथे २४ तास दारू खरेदीसाठी येतात. इतके होऊनही अजनी पोलिसांना या अवैध दारू अड्ड्यांची साधी माहिती कशी नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहेयासंबंधात माहिती मिळताच लोकमतची चमू जेव्हा रेल्वे कॉलनीत पोहोचली तेव्हा कॉलनीतील रेल्वे जनमंडल शाळेजवळ खुर्च्यांवर बसून विक्रेता आणि त्याचे नोकर दिवसाढवळ्या दारुड्यांना दारू वितरित करतांना आढळून आले. हा सर्व प्रकार लोकमतने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. विशेष म्हणजे येथे नियमित येणाऱ्या ग्राहकांना पहिले पैसे घेऊन सर्रास दारूवितरित केली जाते. परंतु अनोळखी व्यक्तीला मात्र दारू देतांना त्याची चांगलीच विचारपूस केली जाते. खात्री पटल्यावर क्वॉर्टरच्या आतून दारुची बॉटल आणून दिली जाते. परंतु या अड्ड्याची सारी कार्य पद्धती पुरावा म्हणून कॅमेऱ्यात कैद करण्याची योजना तयार करण्यात आली. स्टिंग आॅपरेशनसाठी लोकमत चमूचा एक सदस्य आपली वेशभूषा बदलवून बोगस ग्राहक बनून या अड्ड्यावर पोहचला. अनोळखी ग्राहक पाहून अड्ड्याचा संचालकाने विचारपूस सुरू केली. यावेळी लोकमत चमूचे इतर सदस्य दूर कॅमेऱ्यासह रेकॉर्डिंग करीत होते. विचारपूस केल्यानंतर विक्रेत्याने ४५ रुपयाची देशी दारूची बॉटल ५५ रुपयात दिली. स्थानिक लोकांनुसार अड्ड्यासमोरील मोकळ्या जागेवर पाण्याची व्यवस्था असल्याने रात्रीच्या वेळी दारुडे गर्दी करतात. परंतु पोलीस व आरपीएफकडून कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या अड्ड्याचा संचालक निर्धास्त आहे. दारूअड्ड्यावरच दोन धार्मिक स्थळे या दारूच्या अड्ड्याच्या उजव्या आणि डाव्या बाजुने दोन मोठे धार्मिक स्थळ आहेत. स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार सकाळी-दुपारी, सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत दारू अड्डा सुरू राहतो. दारुडे अनेकदा धार्मिक स्थळाजवळ बसून दारू प्यायलाही मागेपुढे पाहत नाही. दारुबंदीच्या दिवशी तर या ठिकाणी सर्रासपणे दारू विकली जाते. दारुड्यांचा दरबार भरतो. यासंबंधात अनेकदा अजनी पोलिसांकडे आणि आरपीएफकडे तक्रार करण्यात आली. परंतु याची माहिती विक्रेत्याला पोहोचते आणि तक्रारकर्त्याला त्यानंतर धमकी मिळते. दारू विक्रेता रेल्वे कर्मचारी नाही दरम्यान नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर लोकांनी सांगितले की, येथे दारू अड्डा चालविणारी व्यक्ती रेल्वे कर्मचारी नाही. असे असताना तो येथील सरकारी क्वॉर्टरमध्ये राहून दारू अड्डा चालवित आहे. याशिवाय त्याने शेजारच्या खाली क्वॉर्टरवर अवैध कब्जा केला आहे. त्यापैकी एका क्वॉर्टरमध्ये दारू चे गोडावून तयार केले आहे. तसेच काही क्वॉर्टर किराणा दुकानदारांना माल ठेवण्यासाठी भाड्याने दिले आहेत. शिवाय येथे बाहेरच्या लोकांच्या बेसेस व इतर वाहनेही पार्क केल्या जात आहेत.कठोर कारवाई करणार यासंबंधी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनी सांगितले की, येथील क्वॉर्टर रेल्वे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना क्वॉर्टर देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय सरकारी कॉलनीत दारू चा अड्डा चालत असेल तर दोषी विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.