शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मद्य शौकिनांना लवकरच मिळणार दारू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:28 IST

दारूची ऑनलाईन डिलिव्हरी होणार असल्याचे ऐकून मद्य शौकिनांना आनंद झाला असला तरी त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते.

ठळक मुद्देवाईन शॉपच्या मालकांना उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाची वाट

धीरज शुक्लालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूची ऑनलाईन डिलिव्हरी होणार असल्याचे ऐकून मद्य शौकिनांना आनंद झाला असला तरी त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते. महापालिका आयुक्तांच्या ऑनलाईन डिलिव्हरीच्या आदेशानंतर वाईन शॉपच्या मालकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. सूत्रांनुसार १४ किंवा १५ मेपर्यंत हे आदेश मिळतील. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मार्गदर्शक तत्त्वे जारी होतील. विक्री कशी करावी आणि नियमांचे पालन कसे करावे हे वाईन शॉपचे मालक ठरवणार आहेत. त्यानंतरच शहरातील १२५ दुकानातून मद्य शौकिनांपर्यंत दारू पोहोचू शकणार आहे.नागपूर लिकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. लवकरच याबाबत आदेश मिळतील, अशी अपेक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. होम डिलिव्हरीसोबत दुकानेही सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे. आपण पूर्णपणे शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करू, असे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. ग्राहक मोठ्या संख्येने आले तरी १-२ दिवसात स्थिती सामान्य होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.अ‍ॅपवरून विक्री वाईन शॉप मालकांना वाटते कठीणकोणत्याही अ‍ॅपच्या मदतीने दारूची डिलिव्हरी करणे वाईन शॉपच्या मालकांना कठीण वाटत आहे. डिलिव्हरी बॉईजचे आरोग्य आणि त्यांच्याकडून नियमांचे पालन होईल की नाही याची शाश्वती घेतल्या जाऊ शकत नाही. त्या ऐवजी दुकानातील कर्मचाऱ्यांना हे काम दिले जाऊ शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते होम डिलिव्हरीसाठी मोबाईल क्रमांक जारी करण्याबाबत मागणी करीत आहेत.काढावा लागू शकतो ऑनलाईन परवानाराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार परवाना सक्तीचा केल्या जाऊ शकतो. असे झाल्यास कायमचा परवाना मिळविण्यासाठी मद्य शौकिनांना वाट पाहावी लागु शकते. काही शुल्क देऊन एका दिवसाचा परवाना वाईन शॉपचे मालक देऊ शकतात. त्यास ऑनलाईनही मिळविता येऊ शकणार आहे.दुकाने सुरू करावी लागतील‘दारूच्या विक्रीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मिळाला नाही. एक-दोन दिवसात याबाबत सूचना मिळतील. अ‍ॅपच्या मदतीने डिलिव्हरी केल्या जाऊ शकत नाही. दुकानाच्या कर्मचाऱ्यांनाच हे काम सोपवावे लागेल. आम्ही दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाला मागितली आहे. यामुळे गर्दी नियंत्रित करून योग्य व्यवस्था ठेवण्यास मदत होईल.’- रामकुमार मोटघरे, अध्यक्ष, नागपूर लिकर असोसिएशनहॉट स्पॉटमध्ये डिलिव्हरी नाहीसध्या दारूच्या होम डिलिव्हरीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश मिळाले नाहीत. आदेश मिळाल्यानंतर पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल. हॉट स्पॉटमधील दारुची दुकाने उघडणार नसून तेथे होम डिलिव्हरीसुद्धा करणे शक्य होणार नाही.’-राजू जायस्वाल, अध्यक्ष नागपूर परमिट रूम असोसिएशन..............

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस