शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

‘ग्रॅण्ड लाईव्ह पोर्ट्रेट’चा अक्षय पै मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:58 IST

पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘ग्रॅण्ड फायनल लाईव्ह पोर्ट्रेट’ स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी अक्षय पै ठरला.

ठळक मुद्देचौथा वार्षिक कार्यक्रमपोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनचा उप्रकम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ग्रॅण्ड फायनल लाईव्ह पोर्ट्रेट’ स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी अक्षय पै ठरला. ७५ हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, विजय आचरेकर, अब्दुल गफ्फार, प्रकाश घाडगे, मनोज सकळे व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार उपस्थित होते.पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुपच्या चौथ्या वार्षिक कार्यक्रमानिमित्त या स्पर्धेचे आयोजन २३ फेब्रुवारी रोजी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे करण्यात आले होते. स्पर्धेची सुरुवात वासुदेव कामत व विजय आचरेकर यांच्या पोर्ट्रेट प्रात्याक्षिकाने झाली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना कामत यांनी मार्गदर्शन केले. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजतापासून स्पर्धेला सुरूवात झाली. निवड झालेल्या सात स्पर्धकांनी समोर मॉडेलला बसवून ‘लाईव्ह पोर्ट्रेट’ काढले. स्पर्धेचे परीक्षण वासुदेव कामत, विजय आचरेकर, अब्दुल गफ्फार, प्रकाश घाडगे, मनोज सकळे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.संचालन प्रा. सदानंद चौधरी यांनी केले, तर आभार शरद तावडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यात जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे, दिनेश लोहकरे, रमेश सालोडकर, मधू मिश्रा, विशाल सोरटे, स्वप्नील रामगडे, दीपक, अटाळकर, महेश अटाळकर, सदानंद पचारे, साहिल हजारे, अमोल हिवरकर, मीनल बाकलीवाले, सुहास काटकिनवार, वनोद ठाकरे यांचा समावेश होता. कार्यक्रमाला चित्रकार अजय पाटील, विजय काकडे, दिलीप भालेराव, प्रकाश बेतावर, सुनील पुराणिक, किरण पराते, रमेश सालोडकर, प्रा. बावर, डॉ. जयंत पानसरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात चित्रकार व विद्यार्थी उपस्थित होते.

ही एक चळवळबक्षीस वितरणप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विजय दर्डा म्हणाले, चित्रकला ही एक चळवळ आहे. आणि एक दिवस ही चळवळ निश्चितच वाढेल. जगात ज्या प्रमाणे चित्रकाराला सन्मान मिळतो, ती परिस्थीती आपल्याकडे येईल, हा विश्वास आहे. जेवढे महत्त्व प्रथम पारितोषिकाला आहे, तेवढेच महत्त्व या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनाही, असे म्हणत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

कला ही एकमेकाला जोडणारीवासुदेव कामत यांनी सहा मोर्च व २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ‘लाईव्ह पोर्ट्रेट’ स्पर्धेची माहिती दिली. ते म्हणाले, कला ही एकमेकाला वेगळी करणारी नसते, ती जोडणारी असते. इतिहासाचे पानही होते. आपण जेव्हा संघटितपणे काम करतो तेव्हा निसर्गाची मदत मिळते. ‘लाईव्ह पोर्ट्रेट’ हे अव्याहतपणे चालू ठेवायचे आहे, असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले.

यांनी पटकाविला पुरस्कारप्रथम पुरस्कार : अक्षय पै (७५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह)द्वितीय पुरस्कार : कुडलया हिरमेठ (५० हजार रुपये)तृतीय पुरस्कार : वैभव नाईक (२५ हजार रुपये)प्रोत्साहन पुरस्कार : निलीषा फड (१५ हजार रुपये)प्रोत्साहन पुरस्कार : संदीप शिंदे (१५ हजार रुपये)प्रोत्साहन पुरस्कार : रघुवीर शिंदे (१५ हजार रुपये)प्रोत्साहन पुरस्कार : सुरेश जांगिड (१५ हजार रुपये)

टॅग्स :Jawaharlal Darda Art Galleryजवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी