शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर प्रकरणात अकोला पोलिसांचा रोल संपला; आता उच्च पातळीवरून चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 05:45 IST

दिवसभर राज्य पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रदीर्घ विचारमंथन झाले.

नरेश डोंगरेनागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह राज्य पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी गुन्हेगारी षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी दिवसभर राज्य पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकारी तसेच गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रदीर्घ विचारमंथन झाले. त्यानंतर अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. त्यानंतर परमबीर सिंगांसह एकूण ३३ जणांविरुद्ध बुधवारी अकोल्यात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणातील फिर्यादी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज रोहिदास घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह वरिष्ठांकडे काही दिवसांपूर्वी तक्रार पाठवली होती. ही तक्रार तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. पोलीस महासंचालनालय आणि गृहमंत्रालयातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी बुधवारी दिवसभर प्रदीर्घ मंथन केले. प्रकरण ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित असल्यामुळे अकोल्यात ‘झीरो क्राइम’ (गुन्हा दाखल) करून तो तपासासाठी ठाणे आयुक्तांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आदेश अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना देण्यात आले. 

गुन्हा दाखल करून तो वर्ग करेपर्यंत गोपनीयता बाळगण्याचेही आदेश देण्यात आले. त्यानंतर अकोला पोलीस दलातील धावपळ वाढली आणि बुधवारी रात्री १० वाजून ६ मिनिटांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ३३ जणांविरुद्ध गुन्हेगारी षडयंत्र रचणे आणि ॲट्रॉसिटी अशा एकूण २७ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

पहाटेपर्यंत वरिष्ठांना रिपोर्टिंगगुन्हा दाखल केल्यानंतर अकोला पोलीस अधीक्षकांनी त्या घडामोडींची माहिती संबंधित वरिष्ठांना पहाटेपर्यंत दिली. रात्री १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन सारखा ‘एंगेज’ होता.

आमचा रोल संपलाया संबंधाने आज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, ‘या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आता आमचा रोल संपला.’ अशी छोटेखानी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिस