शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अ.भा. मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 8:19 PM

यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. एकीकडे बहुतेक मान्यवर सारस्वतांनी संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या आडमुठ्या व एककल्ली कारभारामुळे ही लाजिरवाणी स्थिती उद्भवल्याची टीका करीत नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महामंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी केली.

ठळक मुद्देश्रीपाद जोशींवर चहुबाजूने टीकास्त्रसंमेलन आणि मराठीची विश्वासार्हता गमावल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. एकीकडे बहुतेक मान्यवर सारस्वतांनी संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या आडमुठ्या व एककल्ली कारभारामुळे ही लाजिरवाणी स्थिती उद्भवल्याची टीका करीत नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महामंडळाचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी केली.कायम तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन जगणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटनाचे निमंत्रण द्यावे आणि संमेलनाच्या ऐन तोंडावर अशाप्रकारे निमंत्रण रद्द करून त्यांचा अपमान करण्यात आल्याने एकूणच मराठी साहित्यिकांमध्ये नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे संमेलनाच्या इतिहासात लाजिरवाणी घटना घडली असताना साहित्य महामंडळ आणि स्वागत संस्था खंत व्यक्त करण्याऐवजी या पापाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत चिखलफेक करण्यात मश्गूल असल्याने साहित्य क्षेत्रही ढवळून निघाले आहे. एकीकडे साहित्यिक नाराज आहेत तर दुसरीकडे नागपूरपासून मुंबईपर्यंत पडद्यामागे शिजलेल्या या घटनाक्रमाचे पाप यवतमाळच्या मातीवर लादल्याने आतापर्यंत संमेलनासाठी उत्साही असलेल्या यवतमाळकर रसिकांचाही भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे सामान्य रसिकांच्या देणग्यांतून आयोजित झालेले हे संमेलन वाया गेले काय, ही निराशा त्यांच्यात आहे.आयोजक संस्था डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालयाचे पद्माकर मलकापुरे यांनी बॉम्बगोळा टाकत महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हेच या घटनाक्रमासाठी जबाबदार असून ते हुकूमशाहसारखे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मलकापुरे यांच्या आरोपामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे संमेलनाच्या आयोजनाच्या घोषणेपासून आयोजक संस्थेमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच आयोजक व महामंडळामधले मतभेद सातत्याने समोर येत आहेत. डॉ. श्रीपाद जोशी हे हिटलरप्रमाणे वागतात, कुणाचे ऐकत नाही व कुणाला बोलू देत नसल्याचा आरोप सातत्याने आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार केला आहे. एकीकडे आयोजक आणि महामंडळ यांच्यामध्ये वाद चालला असताना महामंडळाच्या घटकासंस्थांकडूनही महामंडळ अध्यक्षांच्या कारभारावर अनेकदा आक्षेप घेतला आहे. नयनतारा सहगल यांच्यासारख्या प्रतिभावंत लेखिकेचे निमंत्रण रद्द करणे योग्य नाही. राजकीय दबाव असला तरी ही गंभीर चूक असून यासाठी महामंडळाचे अध्यक्ष जबाबदार आहेत. त्यांची कार्यपद्धती आक्षेपार्ह आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या समृद्ध परंपरेला मोठा डाग लागला आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. श्रीपाद जोशी यांनी राजीनामा द्यावा. श्रीकांत तिडके, ज्येष्ठ साहित्यिक. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मामेबहीण असूनही त्यांच्याविरोधात नयनतारा सहगल यांनी भूमिका घेतली होती. त्यांच्या वैचारिक पातळीच्या विरोधातील भूमिका महामंडळ व आयोजकांनी घेतली. संमेलनाच्या तोंडावर घेतलेला निर्णय लहान नाही व याविषयी घटक संस्थांशी कोणतीही चर्चा महामंडळ अध्यक्षांनी केली नाही. ही गंभीर बाब असून त्याच्या परिणामांची जाणीव महामंडळ व आयोजकांनाही नाही. यामुळे आधीच बहुतेक मान्यवर साहित्यिकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने हे संमेलनच धोक्यात आले आहे. कौतिकराव ठाले पाटील, मराठवाडा साहित्य संस्था.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ