शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अजनी सॅटेलाईट टर्मिनलचे काम सुरू : आठ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:19 IST

अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल बनविण्याच्या कामाने पुन्हा एकदा गती घेतली आहे. बजेटमध्ये घोषणा केलेला आठ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. निधीच्या तुटवड्यामुळे हे काम मागील सहा महिन्यांपासून थांबले होते.

ठळक मुद्दे सोयीसुविधा होणार उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल बनविण्याच्या कामाने पुन्हा एकदा गती घेतली आहे. बजेटमध्ये घोषणा केलेला आठ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. निधीच्या तुटवड्यामुळे हे काम मागील सहा महिन्यांपासून थांबले होते.अजनी रेल्वेस्थानकावर सुरू झालेल्या कामात स्टॅबलिंग लाईन, सिस्टीम ऑफीस, प्लॅटफार्म ३ ची ड्रेन व वॉटरिंग सिस्टीमचे काम करण्यात येत आहे. यानंतर येथे प्लॅटफार्म क्रमांक ५, ६, ७ आणि ८ तयार होणार आहे. कॉलनीकडे एक टर्मिनल व गेट तयार करण्यात येईल. शहरात रेल्वेच्या विकासासाठी निगडित ही मोठी योजना आहे. यामुळे मुख्य रेल्वेस्थानकावरील ताण कमी होणार आहे. प्रवाशांना अधिक सुविधा आणि अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविता येऊ शकणार आहे. हे काम मे २०१८ पासून सुरू झाले होते. सुरुवातीला कॅरेज अ‍ॅन्ड वॅगन शाखेसाठी इमारत तयार करण्यात आली होती. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार वर्षभरात ५० लाख, १.५० कोटी आणि पुन्हा ५० लाख रुपये तीन टप्प्यात मिळाले. १९ कोटीच्या योजनेसाठी ही अतिशय कमी रक्कम आहे. सॅटेलाईट टर्मिनसचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु पहिल्या वर्षी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ काम थांबल्यामुळे ते वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. आता आठ कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. हे काम मध्य रेल्वे झोन मुख्यालयाच्या बांधकाम शाखेच्या देखरेखीखाली सुरू आहे.एनएचएआय करणार कामअजनी रेल्वे परिसरात रेल्वेशिवाय नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) याला इंटर मॉडेल स्टेशन करणार आहे. एक हजार कोटीच्या या प्रकल्पात होणाऱ्या या कामानंतर अजनी रेल्वेस्थानक देशातील पहिले सर्व सोयीसुविधायुक्त स्टेशन ठरणार आहे. इंटर मॉडेल स्टेशनमध्ये बसस्टॅन्ड, मेट्रो रेल्वे, ई-रिक्षा, टॅक्सी उपलब्ध राहील. ७५ एकर जमिनीवर तीन लेव्हलवर सुविधा राहतील. यात अंडरग्राऊंड पॅसेंजर लाऊंज, व्हीकल पार्किंगसारख्या व्यवस्थांचा समावेश आहे.चार महिन्यानंतर सुरू होणार काम‘रेल्वेसोबत अजनी इंटर मॉडेल स्टेशन तयार करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे. जमिनिशी निगडित काही औपचारिकता शिल्लक आहेत. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार महिन्यानंतर कामाला सुरुवात होईल.’ एम. चंद्रशेखर, प्रादेशिक महाव्यवस्थापक, एनएचएआय

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर