शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांचा सिंचन घोटाळ्याशी संबंध आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:30 IST

माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्याशी संबंध आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली. तसेच, यावर येत्या २२ फेब्रुवारी रोजी भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्याशी संबंध आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली. तसेच, यावर येत्या २२ फेब्रुवारी रोजी भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला.माजी आमदार संदीप बाजोरिया संचालक असलेल्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळालेल्या चार सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटांविरुद्ध अतुल जगताप (कंत्राटदार) यांच्या जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यात पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून कंपनीला ही कंत्राटे मिळवून दिली असा आरोप आहे. सरकारने चारही प्रकल्पांच्या चौकशीबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. परंतु, त्यात पवार यांचा घोटाळ्याशी काही संबंध आहे किंवा नाही यावर काहीही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने सरकारला फटकारले. सरकारची एकंदरीत कृती पाहता याचिकेतील आरोपांना बळ मिळते असे मत न्यायालयाने व्यक्त करून यावर ठोस उत्तर मागितले.चौकशी अधिकाऱ्यांची माहिती मागितलीअमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पावर याचिकाकर्त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकल्पांतील गैरव्यवहाराची चौकशी कोणते अधिकारी करीत आहेत व प्रकल्पांचा रेकॉर्ड कुणाकडे आहे याची माहिती देण्याचे निर्देश सरकारला दिलेत. तसेच, संदीप बाजोरिया यांच्याबाबतही भूमिका मांडण्यास सांगितले.व्हीआयडीसीच्या रेकॉर्डवर असमाधानविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने चारही प्रकल्पांच्या टेंडरबाबतचा रेकॉर्ड न्यायालयात सादर केला. परंतु, त्यातील बहुतेक कागदपत्रे याचिकाकर्त्याने माहितीच्या अधिकारांतर्गत मिळविली आहेत. त्यामुळे न्यायालयाने रेकॉर्डवर असमाधान व्यक्त केले. याचिकाकर्त्याचे आरोप खरे किंवा खोटे ठरतील असे काहीच रेकॉर्डमध्ये नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAjit Pawarअजित पवार