शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या  नागपुरातील  एमआरओमध्ये आतापर्यंत २५ विमाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 20:34 IST

एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओ अर्थात विमानांची देखभाल व दुरुस्ती केंद्रात आतापर्यंत २५ बोर्इंग विमानांची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंग-७७७ हे २५ वे विमान शनिवारी दुरुस्तीनंतर (चेक-सी) एका विशेष समारंभानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता रवाना करण्यात आले.

ठळक मुद्दे मिहान एमआरओ : शनिवारी २५ वे विमान दुरुस्तीनंतर रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओ अर्थात विमानांची देखभाल व दुरुस्ती केंद्रात आतापर्यंत २५ बोर्इंग विमानांची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंग-७७७ हे २५ वे विमान शनिवारी दुरुस्तीनंतर (चेक-सी) एका विशेष समारंभानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता रवाना करण्यात आले.समारंभात मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर, सुरक्षा प्रमुख यशवंत सराटकर, एमआरओच्या इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख एस.एस. काजी, एअर इंडियाचे वरिष्ठ स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे आणि एमआरअ‍ोचे अधिकारी उपस्थित होते.जागतिक दर्जाच्या सोयीसुविधानागपूर मिहान प्रकल्पातील एमआरओ सुविधा ५० एकरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेला हा प्रकल्प ६०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला असून ३.५ कि.मी. टॅक्सी-वेला जोडला गेला आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि १०० मीटर बाय १०० मीटरचे दोन हँगर आहेत. मोठ्या विमानांसह सर्व प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सोय आहे. बोर्इंग विमानांसाठी विशेष व्यवस्था आहे. प्रशिक्षित आणि अनुभवी अभियंते आहेत. बोर्इंगने प्रकल्पाचे काम मार्च २०११ मध्ये सुरू केले आणि प्रकल्प साडेतीन वर्षांत पूर्ण केला. २९ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकल्प एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि २७ आॅगस्ट २०१५ रोजी कार्यान्वित झाला. एअर इंडियाने स्पाईसजेट विमानांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी १२ आॅगस्ट २०१६ मध्ये करार केला. स्पाईसजेटची दोन विमाने आतापर्यंत एमआरओमध्ये तपासणी आणि दुरुस्तीसाठी आली आहेत. स्पाईसजेटच्या ताफ्यात ४२ विमाने आहेत.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर