शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:24 IST

एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.हजच्या उड्डाणासाठी एअर इंडियाने विमानाला नागपूर-मुंबई आणि विशाखापट्टणम-मुंबई एकत्रित करून चालविले. याच कारणामुळे नागपुरातून परतीनंतर विमानाच्या क्रमांकात बदल केला नाही. एआय६२९ दररोज नागपुरातून मुंबईला परत जाताना ६३० क्रमांकाने उड्डाण भरते. सोमवारी हेच विमान मुंबईहून विशाखापट्टणम मार्गे नागपुरात आले होते.एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, हज उड्डाणासाठी विमानाच्या व्यवस्थेत सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांसाठी बदल केला आहे. एअर इंडियाचे सकाळचे मुंबई-नागपूर-मुंबई उड्डाण १ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत आठवड्यात तीन दिवस बंद राहील आणि चार दिवस सुरू राहील. या कालावधीत एआय६२७ मुंबई-नागपूर व एआय ६२८ नागपूर-मुंबई विमान आठवड्यात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला उपलब्ध राहील. आठवड्यात अन्य दिवसात ही उड्डाणे रद्द राहतील. हज उड्डाणांसाठी काही शेड्यूल विमानांचे संचालन अस्थायीरीत्या बंद करण्यात आले आहे. देशात हजकरिता महत्त्वपूर्ण एम्बॉर्केशन पाईंटवरून एक वा दोन उड्डाणांमध्ये वाढ झाली आहे. याच कारणामुळे एअर इंडियाने वेळापत्रकात बदल केला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबई