लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत. महिला आयोगावर माझी नेमणूक झाली तेव्हा वास्तवाची जाण नसलेले लोक योजना तयार करत असत, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील, असा सवाल उपस्थित करतानाच छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके यांनी योजनाकारांनी ग्रासरुटवर जाऊन, वास्तवाची जाणीव करवून घेऊन योजना साकाराव्या असे आवाहन केले.
महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याची गरज - शांताक्कामहिलांचे सक्षमीकरण करताना त्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी समाजात काम करण्याची गरज आहे. त्यांची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून, ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार भारतीने काम करण्याची गरज आहे. स्त्री ही शक्तिस्वरुपा आहे आणि ती समाजात परिवर्तन घडवू शकते म्हणून महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याचे आवाहन शांताक्का यांनी यावेळी केले.राज्यपालांनी घेतले स्मारकाचे दर्शनउद्घाटनापूर्वी राज्यपाल अनसूया उईके यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. सहकार भारतीचे हे आयोजन महिलांना सशक्त आणि स्वावलंबी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे उईके यावेळी म्हणाल्या.