शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एम्स : डॉक्टरांच्या पदभरतीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:09 IST

‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’चे (एम्स) एमबीबीएसचे ५० विद्यार्थी दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणार आहेत, तर पुढील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे २५ शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला घेऊन आडवी आलेली आचारसंहिता शिथिल होताच पदभरतीला सुरुवात झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देयेत्या शैक्षणिक वर्षात १०० जागांवर प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’चे (एम्स) एमबीबीएसचे ५० विद्यार्थी दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणार आहेत, तर पुढील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे २५ शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला घेऊन आडवी आलेली आचारसंहिता शिथिल होताच पदभरतीला सुरुवात झाल्याची माहिती आहे.नागपूर ‘एम्स’साठी ‘अ‍ॅनाटॉमी’, ‘फिजिओलॉजी’, ‘बायोकेमेस्ट्री’, ‘कम्युनिटी मेडिसीन’, ‘पॅथालॉजी’, ‘मायक्रोबॉयलॉजी’, ‘फार्मेकालॉजी’ व ‘फॉरेन्सिक’ विद्याशाखेसाठी आठ प्राध्यापक, चार अतिरिक्त प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक, १६ सहायक प्राध्यापक, १२ वरिष्ठ निवासी डॉक्टर तर आठ ट्युटर्स असे मिळून ५२ पदे निर्माण करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ३९ पदे भरण्यात आली. उर्वरित १३ व वाढीव पदे अशी मिळून सुमारे २५ शिक्षकांची पदे भरण्याच्या कार्याला गेल्या काही महिन्यापासून ‘एम्स’ने गती दिली होती. सूत्रानुसार, एम्स एमबीबीएसच्या दुसºया वर्षासाठी व नव्या सत्रातील १०० विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची तातडीने पद भरती करणे आवश्यक होते. परंतु आचारसंहिता आडवी आली. यासाठी एम्सच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यांच्या मंजुरीनंतर रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु नावाच्या घोषणेला घेऊन दिल्ली येथे नागपूर ‘एम्स’चे अध्यक्ष डॉ. पी. के. दवे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे २३ मेनंतर निवड झालेल्या शिक्षकांची नावे वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर