शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दोन दिवसापासून एम्सची लॅब बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:33 IST

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतील तीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह आल्याने मागील दोन दिवसांपासून चाचण्या बंद पडल्या आहेत. मेयो, मेडिकलसह इतर प्रयोगशाळांवर चाचण्यांचा भार वाढला आहे.

ठळक मुद्देतीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह मेयो, मेडिकलवर चाचण्यांचा वाढला भार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांना सेवा देणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफही आता कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत. परिणामी, रुग्णसेवेला फटका बसत आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतील तीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ पॉझिटिव्ह आल्याने मागील दोन दिवसांपासून चाचण्या बंद पडल्या आहेत. मेयो, मेडिकलसह इतर प्रयोगशाळांवर चाचण्यांचा भार वाढला आहे.

नागपुरात सुरुवातीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) प्रयोगशाळेतच कोरोनाची तपासणी व्हायची. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) प्रयोगशाळेत चाचणीला सुरुवात झाली. ३ एप्रिल रोजी मेयोच्या प्रयोशाळेतील आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणाऱ्या यंत्रात बिघाड आले. यामुळे रातोरात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी एम्सच्या संचालक व मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून ते आतापर्यंत, सलग चार महिने २४ बाय ७नुसार प्रयोगशाळा सुरू होती. रोज २५०वर नमुने तपासले जात होते. अचानक प्रयोगशाळेतील तीन डॉक्टरांसह चार तंत्रज्ञ काही लक्षणे आढळून आल्याने त्यांनी आपली चाचणी केली असता सर्वच पॉझिटिव्ह आले. परिणामी, १ सप्टेंबरपासून प्रयोगशाळा बंद आहे.

 रोज सहा हजारावर तपासण्यानागपूर शहरात मेयो, मेडिकल, एम्ससह नीरी, माफसू व चार खासगी लॅबमध्ये कोरोना तपासणी केली जात आहे. रोज सहा हजारावर तपासण्या होत आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार वाढला आहे. यात प्रयोगशाळेतील डॉक्टर व तंत्रज्ञ पॉझिटिव्ह येत असल्याने तपासण्याचा वेग मंदावला आहे.

एम्समध्ये वाढल्या ऑक्सिजनच्या खाटाएम्समध्ये कोरोनाबाधितांठी ५० खाटांचा स्वतंत्र वॉर्ड आहे. यातील १९ खाटांवरच ऑक्सिजनची सोय होती. परंतु आता रुग्णांची वाढती संख्या व गरज पाहून उर्वरित ३१ खाटांपर्यंत ऑक्सिजन पाईपलाईन पोहचविण्यात आली आहे. याचा फायदा रुग्णांना होणार आहे.

एम्सच्या रुग्णांवर कसा होणार उपचार?शासनाच्या निर्देशानुसार, एम्सचे डॉक्टर इतर शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णसेवेत पाठविण्यात आले आहेत. परिणामी, रुग्णसेवेचा मोठा ताण मोजक्याच डॉक्टरांवर आला आहे. कोरोनाबाधितांना सेवा द्यायची कशी, या अडचणीत एम्स प्रशासन सापडले आहे. परिणामी, कोविडच्या खाटा वाढविण्यापासून ते इतर कामे खोळंबल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.प्रयोगशाळा सुरू होणारएम्सच्या प्रयोगशाळेतील डॉक्टर व तंत्रज्ञ कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे प्रयोगशाळा बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी प्रयोगशाळा सॅनिटाइझ करण्यात आली. उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.-डॉ. विभा दत्तासंचालक, एम्स

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस