शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

एआय की केमिकल? इंजिनीअरिंगची शाखा निवडीचा 'स्मार्ट' मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:14 IST

कटऑफपेक्षा 'कुतूहल' महत्त्वाचं! : इंजिनीअरिंग शाखा निवडताना काय लक्षात घ्याल?

डॉ. श्रीराम सोनवणे, व्हीएनआयटीनागपूर : भारतभरात अभियांत्रिकीच्या पदवीपूर्व प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत. विद्यार्थी आणि पालक, कोणती शाखा घ्यावी, या महत्त्वाच्या प्रश्नाशी सामना करत आहेत. आयआयटी, एन-आयटी आणि नामांकित खासगी महाविद्याल-यांमध्ये प्रवेशासाठी लाखो विद्यार्थ्यांमध्ये चुरस आहे. त्यातच एआय, डाटा सायन्स, मशिन लर्निंग या संगणकीय शाखेतील तंत्रज्ञानाने अभियांत्रिकी शिक्षणाचा ट्रेंडच बदलला आहे. मात्र इंजिनीअ रिंगच्या प्रत्येक शाखेत, किंबहुना प्रत्येक क्षेत्रात एआय, डाटा सायन्सचा अंतर्भाव अगत्याचा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ट्रेंडचा पाठलाग कर-ण्यापेक्षा आपली आवड, क्षमता आणि भविष्यातील बदल याचा समतोल साधून शाखा निवडावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

कटऑफपेक्षा कुतूहल महत्त्वाचेअनेक विद्यार्थी फक्त उच्च पगाराच्या संधी पाहून शाखेची निवड करतात, पण स्वतःची आवड, कल आणि दीर्घकालीन करिअर ध्येय दुर्लक्षित करतात. शाखा ही नुसती नोकरी मिळवण्याचे साधन नसून, तुम्हाला कसा अभियंता व्हायचे आहे, हे ठरवणारी संधी आहे. पालकांनी परंपरागत निवडी लादण्यापेक्षा मुलांमध्ये आत्मशोधाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

निर्णय घेण्यापूर्वी विचारात घ्याव्यात अशा गोष्टी

  • स्वतःला ओळखाः तुम्हाला प्रयोगशाळा आवडते की कोडिंग? डेटा की उपकरणं
  • संस्थेचा अभ्यास कराः प्राध्यापक, प्रयोगशाळा, इंटर्नशिप आणि प्लेसमेंट तपासा.
  • ज्येष्ठ विद्यार्थ्यांशी बोलाः सल्ला घ्या आणि प्रत्यक्ष अनुभव समजून घ्या.
  • कोर इंजिनीअरिंगकडे दुर्लक्ष करू नकाः केमिकल, सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रानिक्स या मूल शाखांमध्ये आता एआय, आयओटी, डेटा अॅनालिटिक्सचा समावेश होत आहे.
  • कोणतीही शाखा ही कमी लेखण्यासारखी नाही, समर्पित अभ्यास महत्त्वाचा.

तंत्रज्ञान झपाट्याने बदलते,एआय, सायबरसिक्युरिटी, डेटा सायन्स यांसारख्या नवीन शाखा आकर्षक असल्या तरी त्या गंभीर संगणकीय अभ्यासाची गरज असलेल्या आहेत आणि त्यांच्या व्याप्तीमध्ये झपाट्याने बदल होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोर्सची खोली आणि भविष्यातील गरजांवर विचार करून निर्णय घ्यावा. 

केमिकल इंजिनीअरिंग : बहुपर्यायी आणि भविष्यकालीन शाखा

  • केमिकल इंजिनीअरिंग ही आजच्या घडीला सर्वात बहुउपयोगी आणि लवचिक शाखांपैकी एक आहे. ही शाखा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आणि जीवशास्त्र यांचा समन्वय साधणारी शाखा आहे.
  • पेट्रोकेमिकल्स आणि ऊर्जा औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान अन्न प्रक्रिया आणि पर्यावरण तंत्रज्ञान नॅनोतंत्रज्ञान आणि प्रगत साहित्ये
  • अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअरिंगच्या अहवालानुसार, केमिकल इंजिनीअर्स हे हरित हायड्रोजन, कार्बन कॅप्चर, कचऱ्यातून ऊर्जा आणि प्रक्रिया सुधारणा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
टॅग्स :Educationशिक्षणArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सnagpurनागपूर