शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रो व्हिजन : मधुमक्षिका पेटी ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:12 IST

बियाणे खरेदी करा, शेतात पेरा, पिकांना पाणी द्या, ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन चांगले येईल याची गॅरंटी नसते. पण शेतातील पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मधुमक्षिका पेटी’ यावर रामबाण उपाय ठरत आहे. मधुमक्षिका पेटीमुळे शेतातील उत्पादन वाढण्याबरोबरच, विक्रीसाठी मधही मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतोय. अ‍ॅग्रो व्हिजन प्रदर्शनात शेतीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासंदर्भात मधुमक्षिका पेटी स्टॉल आहे.

ठळक मुद्देशेतातील पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी रामबाण उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बियाणे खरेदी करा, शेतात पेरा, पिकांना पाणी द्या, ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन चांगले येईल याची गॅरंटी नसते. पण शेतातील पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मधुमक्षिका पेटी’ यावर रामबाण उपाय ठरत आहे. मधुमक्षिका पेटीमुळे शेतातील उत्पादन वाढण्याबरोबरच, विक्रीसाठी मधही मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतोय.अ‍ॅग्रो व्हिजन प्रदर्शनात शेतीचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासंदर्भात मधुमक्षिका पेटी स्टॉल आहे. बारामती येथे मधुमक्षिका पेटी तयार करण्यात येत आहे. या पेटीच्या माध्यमातून शेतातील पिकांचे उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचे याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही पेटी केवळ बारामती येथेच उपलध आहे. सध्या या पेटीबाबत विविध कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती केली जात आहे. या पेटीत राणी माशी सोडल्यास ती दिवसाला ३५० ते ४०० अंडी देते. प्रक्रिया होऊन माशा मोठ्या व्हायला साधारणत: १५ दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर पेटीतील माशा शेताच्या मध्यभागी सोडल्या जातात. शेतात १०० फुले लागली असल्यास १०० फळे लागतीलच याची शाश्वती नसते. कारण, फुलांमध्ये परागभवन झालेले नसते. त्यामुळे एक-एक माशी प्रत्येक फुलावर बसल्यास १०० टक्के परागभवन होऊन फळधारणा होईल. परिणामी, शेतातील उत्पन्नात आपसूकच भर पडेल. माशा शेतात सोडताना त्या अंगावर येऊ नये म्हणून एक स्वतंत्र धूर पसरविण्याचे यंत्रही पेटीसोबत आहे. शेणखतात थोडा जळता कोळसा टाकल्यास धूर बाहेर पडेल. या धुरामुळे माशा अंगावर येऊन चावणार नाहीत. याशिवाय माशांपासून सुरक्षा करणारी संरक्षण किटसुद्धा उपलब्ध आहे. मधुमक्षिका पेटीमुळे मध मिळत असल्याने ते विकून दोन पैसे अधिक मिळतील, असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांचा आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी