शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रो व्हिजन : बांबूपासून आॅईल आणि शर्ट सुद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:28 IST

विदर्भात बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूच्या शेतीकडे आकर्षित करून त्यांची आर्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात बांबूवर आधारीत उत्पादनाचा स्टॉल महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डमार्फत स्टॉल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूच्या शेतीकडे आकर्षित करून त्यांची आर्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून अ‍ॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात बांबूवर आधारीत उत्पादनाचा स्टॉल महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून लावण्यात आला आहे. 

बोर्डाचे संचालक टीएसके रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बांबूच्या उत्पादनाची माहिती देण्यात येत आहे. स्टॉलवर बांबूपासून तयार करण्यात आलेले बायो-आॅईल, बायो इथेनॉल व चारकोल ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा अनेकदा आपल्या भाषणातून बांबूपासून आॅईल तयार करण्यासाठी संशोधन करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. बांबूपासून तयार करण्यात आलेले आॅईल परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. भविष्यात वाहनांचे इंधन म्हणून सुद्धा याचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर बांबू व रेशीम व कॉटनचे मिश्रण तयार करून कापड व शर्ट तयार करण्यात आले आहे. स्टॉलवर बांबूपासून बनविण्यात आलेले फर्निचर, गृहसजावटीच्या वस्तू, आकर्षक कलाकृतीसुद्धा आहे. सोबतच देशभरात उपलब्ध असलेल्या बांबूच्या १२०० प्रजातीची माहिती या स्टॉलवर उपलब्ध आहे.बांबूचे पडदेबांबूपासून तयार केलेल्या पडद्यांचा स्टॉल सुद्धा येथे आहे. रमेश जीवने हे गेल्या २८ वर्षापासून बांबूचे पडदे तयार करीत आहे. सुरूवातीला अगदी छोट्या स्वरुपात असलेल्या त्यांच्या व्यवसायाचे आता कारखान्यात रुपांतर झाले आहे. त्यांच्या उत्पादनाला देशभरातून मागणी आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी