शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शेतकऱ्यांचा कृषिमाल थेट ग्राहकांसाठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:02 IST

शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे ब्लॅक राईस, पार्वती सूत तांदळाला ग्राहकांची पसंतीफळे, भाजीपाला व विविध कृषिमाल उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.कृषी विद्यापीठ परिसरात शनिवारपासून जिल्हा कृषी महोत्सव सुरू झाला असून, या ठिकाणी शेतमाल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा महोत्सव बुधवार १६ जानेवारीपर्यंत चालणार असून, उद्घाटनाच्या दिवशी नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद देत कृषिमालाची खरेदी केली. भरपूर पोषणतत्त्व आणि राज्यात प्रथमच पिकविण्यात आलेल्या ब्लॅक राईसला ग्राहकांनी प्रथम पसंती दिली आहे.या ठिकाणी कृषी उत्पादित मालासोबतच गृहोद्योग आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषीउत्पादनावर प्रक्रिया करून विविध प्रकारची चटणी, लोणचे, फळांचे मुरब्बे, पापड, कुरडया, फळे, भाजीपाला, मध, पपई, विविध वाणांचा तांदूळ, गहू, हरभरा, बटाटे, संत्री, मोसंबी यासह अनेकविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचे २०० वर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्धव्यवसाय, कृषी पणन, फुलशेती, खादी ग्रामोद्योग, कापूस संशोधन केंद्र, महाबीज आदी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे कृषीशी निगडित विभागांचेही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत.या जिल्हा कृषी महोत्सवाचे आमदार नागो गाणार व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे डॉ. विजय वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आणि आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर उपस्थित होत्या. या महोत्सवात सर्व दिवस विविध कृषितज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.या महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महामंडळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, भारत संचार निगम, जिल्हा परिषद, संशोधन संस्था आदी स्टॉल आहेत. या महोत्सवात ४६ शेतकऱ्यांच्या सेंद्रिय गटांकडून सेंद्रिय माल प्रदर्शन व विक्रीकरिता ठेवण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी, गटसंस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर