वेळाहरी येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST2021-07-03T04:07:23+5:302021-07-03T04:07:23+5:30

वाडी : वेळाहरी (ता. नागपूर ग्रामीण) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी माजी मुख्यमंत्री ...

Agriculture Day program at Velahari | वेळाहरी येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम

वेळाहरी येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम

वाडी : वेळाहरी (ता. नागपूर ग्रामीण) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सचिन इंगळे, खरसोलीचे सरपंच आशिष चुरड, उपसरपंच प्रभाकर काळबांडे, ग्रामसेवक चंद्रशेखर मुंगले, ग्रामपंचायत सदस्य आकाश पिसार, माधुरी बोधनकर, प्रियंका पाटील, शालिनी थूल, सोनाली शेलकर, कविता ठाकरे उपस्थित हाेते. शंकरपूर (ता. नागपूर ग्रामीण) येथील नूतन पुंडलिक राऊत व चंदा राऊत या शेतकरी दाम्पत्याचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चित्रा दांदडे, शोभा दांदडे, सचिन वांढरे, राजू कुतरमारे, छाया ठाकरे, मनोहर सांबरे, नीलेश आगलावे, संदीप कोटरुंगे, मंगेश मोहरले, दामोधर कोटरुंगे, प्रवीण शिंदे, रिता तिवारी, सोनाली कानस्कर यांच्यासह शेतकऱ्यांनी हजेरी लावली हाेती.

020721\img_20210701_203950.jpg

विजेता शेतकऱ्यांचा सत्कार करताना सरपंच सचिन इंगळे व ग्रा सदस्य

Web Title: Agriculture Day program at Velahari