शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन होईल

By admin | Updated: May 28, 2017 02:35 IST

शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर,...

बनवारीलाल पुरोहित : नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कोरडवाहू शेती करणारा शेतकरीही प्रगती करू शकेल. या केंद्रातून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून येईल, असा विश्वास आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केला. नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल मुताने, खा. अशोक नेते, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. डॉ. अनिल बोंडे, आ. डॉ. सुनील देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अमरावतीचे महापौर संजय नरोणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, किशोर धारिया, उद्योगपती दिलीप गोसल, सुधाकर शेट्टी उपस्थित होते. बनवारीलाल पुरोहित म्हणाले, आज पाण्याचा सिंचनासाठी अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या विकास केंद्राने पाण्याच्या वापरासोबतच संत्रा, मोसंबी, टमाटर यासह अन्य फळे व पिकांवर प्रक्रिया करण्याची तसेच त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी जे पिकते ते विकण्यापेक्षा जे विकते ते पिकविण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात सदैव शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार घोळत असतो. ते रस्त्याचे लोकार्पण करायला जरी आले असले तरी त्यामागे त्यांचा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच हेतू असतो. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते देशातील उद्योगपत्यांपेक्षा मोठे होऊ शकतात. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्र करणार आहे. शेतकऱ्यांनी ते विकते तेच पिकविले पाहिजे. गिरीश गांधी हे ध्येयवेडे आहेत. त्यांनी ही नितीन गडकरी यांना दिलेली सर्वोत्तम भेट होय, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर बंडोपंत उमरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नरखेड, काटोल, वरुड, मोर्शी, कारंजा (घाडगे), आर्वी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्पादकता वाढविण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक - पालकमंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोणत्याही बाबीची उत्पादकता वाढविण्यासाठी त्याचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. याला शेतीक्षेत्रही अपवाद नाही. गिरीश गांधी यांनी नेमकी हीच बाब हेरून या विकास केंद्राची निर्मिती केली. यासाठी त्यांनी कोणतीही शासकीय मदत घेतली नाही. या विकास केंद्राचा फायदा संपूर्ण विर्दभातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात दोन मेगावॅट क्षमतेचे छोटेछोटे सौरऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील पहिला प्रकल्प हा नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे होणार असल्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.