शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी नागपूरसाठी कोरियासोबत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:27 IST

नागपूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी आज कोरियन शासनाच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

ठळक मुद्देकोरियन कंपनी-नागपूर महापालिका यांच्यात सामंजस्य करार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी आज कोरियन शासनाच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.कोरिया सरकारच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशनच्यावतीने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष पार्क संग वू आणि नागपूर महानगरपालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त अश्विन मुद्गल यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनावणे, कोरियन कंपनीचे कुम स्वाँग उन, ली जुंग वूक आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोरियाबरोबर विश्वासार्ह भागीदारी होत आहे.नागपूर शहराच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे. यामुळे नागपूर शहराचे रूप बदलणार आहे. तसेच करारामुळे स्मार्ट नागपूरचे काम जलद गतीने आणि लवकरात लवकर सुरू होऊन वेळेत पूर्ण करण्यात येईल. स्मार्ट सिटी प्रकल्पात कोरियाचे शासन गांभीर्याने लक्ष घालत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पुढील काळात आणखी भागीदारी कोरियाबरोबर करण्यात येणार आहे. यावेळी संग वू म्हणाले, कोरिया आणि भारत यांच्यात चांगले संबंध आहेत. या करारामुळे हे नाते दृढ होणार आहे. स्मार्ट सिटीसाठी आम्ही उत्तम काम करू. यासाठी मुंबईत एक संयुक्त कार्यालय लवकरच सुरू करू, असेही त्यांनी सांगितले.या करारानुसार स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीचे धोरण निश्चित करणे, तंत्रज्ञानाचा वापर, विकास क्षेत्रातील माहितीचे आदानप्रदान तसेच स्मार्ट सिटीच्या देखभाल व दुरुस्ती, नागरिकाभिमुख प्रशासन व निधीचा पुरेपूर वापर करणे, वाहतुकीच्या विविध साधनांचा प्रभावी वापर, निधीची उपलब्धता करणे आणि पायाभूत व सेवा क्षेत्राचा विकासासाठी विविध मार्गांचा वापर आदी क्षेत्रात परस्पर सहकार्याने कामे करण्यात येणार आहेत.