९ मिनिटांसाठी लाईट बंद केल्यानंतर कोणताच धोका निर्माण होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:54 PM2020-04-04T12:54:32+5:302020-04-04T12:55:14+5:30

९ मिनिटांसाठी लाईट बंद केल्याने ग्रीड फेल होण्याचा कोणताच धोका नाही अशी ग्वाही राज्याचे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

After turning off the lights for 9 minutes, there is no danger | ९ मिनिटांसाठी लाईट बंद केल्यानंतर कोणताच धोका निर्माण होणार नाही

९ मिनिटांसाठी लाईट बंद केल्यानंतर कोणताच धोका निर्माण होणार नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ९ मिनिटांसाठी लाईट बंद केल्याने ग्रीड फेल होण्याचा कोणताच धोका नाही अशी ग्वाही राज्याचे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री ९ वाजता नऊ मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून मेणबत्ती, दिवे, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूविरुद्ध एकजूटता दाखवण्यासाठी करण्यात आलेल्या या आवाहनानंतर राज्य वीज वितरण कंपनी महावितरण सक्रिय झाली आहे. कंपनीतील सूत्रानुसार याचा परिणाम पडण्याची शक्यता नाही. मात्र तरीही खबरदारी म्हणून ग्रीड व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे ऊजार्मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे की, लाखो-कोट्यवधी लोकांनी जर एकाचवेळी वीज बंद केली तर ग्रीड फेल होऊ शकतो. यामुळे आवश्यक सेवा ठप्प होतील. लोकं लिफ्टमध्ये अडकून मरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी रविवारी रात्री ९ वाजता वीज सुरू ठेवून दिवे जाळावेत, असे आवाहनही केले आहे. राऊत यांचे म्हणणे आहे की, राज्याचा ऊजार्मंत्री या नात्याने ते नागरिकांना संभावित धोक्यापासून सावध करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ९ मिनिटांकरिता वीज बंद केल्याने काहीही धोका होत नाही, महावितरण ही त्याकरिता सक्षम संस्था आहे असे प्रतिपादन केले आहे.

Web Title: After turning off the lights for 9 minutes, there is no danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.