शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील वाघापाठोपाठ आता दाभा परिसरात बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:56 IST

मिहान परिसरात वाघ दिसल्याच्या घटनेची दहशत थोडी शांत होत नाही तोच आता दाभा परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री अमरावती रोडवर काही नागरिकांना बिबट्या धावताना दिसला.

ठळक मुद्देशोधासाठी लावले ट्रॅप कॅमेरे : वाहतूक रोखून वनकर्मचाऱ्यांनी रात्री घातली गस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान परिसरात वाघ दिसल्याच्या घटनेची दहशत थोडी शांत होत नाही तोच आता दाभा परिसरात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री अमरावती रोडवर काही नागरिकांना बिबट्या धावताना दिसला. त्यानंतर वनविभागाने तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अद्यापही मागमूस लागलेला नाही. वाघानंतर आता बिबट्याची दशहत पसरली आहे.शुक्रवारच्या रात्री काही राजकीय पक्षांची मंडळी आपल्या वाहनामधून अमरावती मार्गावरून जात असताना दाभाकडे जाणाºया मार्गावर एक बिबट्या धावताना दिसला. या घटनेची माहिती त्यांनी नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी वनविभागाला ही माहिती दिली. पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नातून रात्रीच वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. वाहतुकीमुळे बिबट्या भरकटू नये यासाठी रात्री मार्गावर दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून वाहतूक रोखून धरण्यात आली. वनविभागाच्या पथकाने रात्री बऱ्याच उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र बिबट्या आढळला नाही.शनिवारी सकाळी पुन्हा त्याच्या शोधासाठी पथक निघाले. मात्र त्याचे पगमार्क मिळू शकले नाही. वायुसेना आणि पीकेव्हीच्या अधिपत्याखाली असलेल्या या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झुुडपी जंगल वाढले आहे. यापूर्वीही या क्षेत्रामध्ये बिबट आणि अन्य वन्यप्राण्यांचा वावर आढळला आहे.गोरेवाडा जंगलातून येऊ शकतो बिबट्यावन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसराच्या अगदी जवळच गोरेवाडा जंगल आहे. त्या जंगलातून भटकलेला बिबट्या या भागात आला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. ही दिशा लक्षात घेता वनविभागाने शनिवारी सायंकाळी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.वाघाचाही अद्याप पत्ता नाहीचार दिवसांपूर्वी मिहान परिसरात व त्यानंतर बुटीबोरीजवळच्या सुमठाणा गावाजवळ दिसलेल्या पट्टेदार वाघाचा ठावठिकाणाही अद्याप लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी वनविभागाने मोठ्या प्रमाणावर ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यात एकदा दिसल्यानंतर तो पुन्हा न दिसल्याने चिंता वाढली आहे. वाघाचे पगमार्क सुकळी आणि खडगा गावालगतच्या शेताजवळ आढळले होते. त्यानंतर मागील दोन दिवसात वाघ कुठेच आढळला नाही. वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा वाघ बुटीबोरीवरून बोर राखीव व्याघ्र प्रकल्पाकडे जाऊ शकतो. तो बोरकडे जाणार हे गृहित धरून या मार्गावरही कॅमेरे लावले आहेत. अद्याप तो कॅमेऱ्यात कैद व्हायचा आहे.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर