शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगच्या मेसेज पाठवल्याने नागपुरातील तरुणाने खाल्ला मार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 9:02 PM

ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तिच्या पतीने त्याला आणि त्याच्या दोन मित्राला या मेसेजचे निमित्त करून बेदम चोप दिला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देमहिलेच्या पतीकडून मिळाला प्रसाद

आॅनलाईन लोकमतनागपूर : ओळखीच्या महिलेला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. तिच्या पतीने त्याला आणि त्याच्या दोन मित्राला या मेसेजचे निमित्त करून बेदम चोप दिला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.सचिन कृष्णराव रामटेककर (वय २२) हा पाचपावलीत राहतो. त्याने नीरज जैन नामक व्यक्तीच्या पत्नीला मंगळवारी गुड मॉर्निंगचा मेसेज पाठविला. तो नीरजने वाचला. नीरजने लगेच सचिनला फोन करून विचारणा केली. त्याने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्याला मेहंदीबागेतील खैरीपुरा चौकात भेटायला बोलवले. मंगळवारी दुपारी ४ वाजता सचिन त्याच्या कुणाल गुप्ता व शुभम बाजीराव नामक मित्रांसह तर नीरज आपल्या सात ते आठ मित्रांना घेऊन उड्डाण पुलाखाली आला. तेथे या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर नीरज आणि त्याच्या मित्रांनी सचिन तसेच त्याच्या दोन्ही मित्रांना बेदम चोप दिला. त्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. कशीबशी सुटका करून घेत तेथून सचिन पळाला. त्याने नंतर शांतिनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा