शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांचे पॅकेज मिळाले अन् त्याने गळफास लावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 21:50 IST

Suicide,Yong, Engineer, Nagpur News सहा दिवसांपूर्वीच नोकरीवर लागलेल्या एका तरुण अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही करुणाजनक घटना घडली.

ठळक मुद्देहुडकेश्वरमध्ये तरुण अभियंत्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: सहा दिवसांपूर्वीच नोकरीवर लागलेल्या एका तरुण अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही करुणाजनक घटना घडली. ती उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. प्रवीण रूपराव वंजारी (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू नरसाळा परिसरातील रहिवासी होता. प्रवीण मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो पुण्याला राहत होता. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात नागपुरात परत आला. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. आईवडील वृद्ध आहेत. एक बहीण कळमन्यातील भरतवाडा परिसरात राहते. कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे प्रवीण, त्याचे आईवडील बहिणीच्या घरीच राहत होते. प्रवीणला ६ ऑक्टोबरला एका कंपनीत जॉब मिळाला. वर्षाला ७ लाखांचे पॅकेजही ठरले. त्यानुसार त्याचे ऑनलाईन ट्रेनिंग सुरू झाले. तेथे पुरेशी प्रायव्हेसी मिळत नसल्याचे सांगून प्रवीण त्याच्या नरसाळा भागातील गिरीराज अपार्टमेंटमध्ये आला. दरम्यान, शनिवारी रात्री प्रवीण त्याच्या वडिलांशी फोनवर बोलला. रविवारी सकाळी पुन्हा वडिलांनी फोन केला. मात्र, प्रवीणकडून फोन उचलला गेला नाही. सायंकाळी पुन्हा फोन केला. मात्र, वारंवार रिंग देऊनही तो फोन उचलत नसल्यामुळे वडिलांनी प्रवीणचा मित्र तेजस सुदाम माटे (वय २३, रा. न्यू सुभेदार लेआऊट) याला फोन करून प्रवीण राहत असलेल्या सदनिकेत जाऊन पहायला सांगितले. त्यानुसार तेजस प्रवीणच्या सदनिकेकडे गेला. दार आतून लावून होते. बरेच आवाज देऊनही प्रवीणकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्याने बाजूच्या खिडकीतून बघितले असता आतमध्ये प्रवीण गळफास लावून दिसला. तेजसने ही माहिती प्रवीणच्या कुटुंबीयांना कळविली. ते पोहचल्यानंतर सर्व जण दार तोडून आत गेले. हुडकेश्वर पोलिसांना कळविण्यात आले. सहायक उपनिरीक्षक प्रेम शुक्ला यांनी तेजसची तक्रार नोंदवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

तुम्ही रडू नका, माफ करा

 मृत्यूपूर्वी प्रवीणने त्याच्या डायरीत सहा पानांची सुसाईड नोट इंग्रजीत लिहून ठेवली. त्यात त्याने कुटुंबीयांना रडू नका, माफ करा, असे कुटुंबीयांना उद्देशून म्हटले असल्याचे समजते.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर