शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सायबर गुन्हेगार सैराट, हेरगिरीच्या नावाखाली करताहेत 'टार्गेट'

By योगेश पांडे | Updated: June 23, 2025 13:05 IST

Nagpur : नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

योगेश पांडेनागपूर : पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' पराबविल्यानंतर देशात हेरगिरीची काही प्रकरणे समोर आली. त्याच काळात एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेली नागपुरातील सुनीता नावाच्या एका महिलेची हेरगिरीच्याच आरोपांवरून चौकशी सुरू आहे. मात्र, प्रत्येक संकटात नवीन संधी शोधणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता 'हेरगिरी' हाच धागा पकडून नवीन जाळे विणले आहे. नागरिकांना फोन करून ते पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करतात व स्वतःला एटीएस किंवा जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून खंडणी उकळत आहेत. हा प्रकार चिंताजनक असून राज्यासोबतच देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला. तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली होती. याच्या चौकशीसाठी अगदी एनआयए, जम्मू-काश्मीर पोलिसदेखील समोर आले. या घटनेनंतर सायबर गुन्हेगारदेखील वेगळ्या पद्धतीने सक्रिय झाले. त्यांनी देशातील काही लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. मुंबईतीलच गिरगाव येथील एका वृद्ध महिलेलादेखील असाच फोन गेला. दिल्ली एटीएस तसेच जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचारी असल्याचे भासवून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला. तिला अज्ञात नंबरवरून तीन कॉल आले. कॉल करणाऱ्याने स्वतःला दिल्ली एटीएसमधील अधिकारी प्रेम कुमार गुप्ता" असल्याचे भासवले. पाकिस्तानशी संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी बतावणी त्याने केली. तिने दाव्यांवर विश्वास ठेवावा यासाठी तिच्या फोनवर महिलेसोबतचा त्याचा ओळखपत्राचा फोटोही शेअर केला. काहीही केले नसले तरी पोलिस आपल्याला अडकवतील या भीतीपोटी घाबरलेल्या महिलेने त्याला २२ लाख रुपये वळते केले. हा प्रकार समोर आल्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनादेखील धक्का बसला. देशातील इतर काही शहरांतदेखील अशा प्रकारे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला.

तुरुंगवासाची दाखवितात भीतीनागरिकांचा पाकिस्तानसोबत दुरान्वये संबंध नसतानादेखील नागरिक अलगदपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. फसवणूक करणारे अगोदर पोलिस अधिकारी असल्याचे बोगस आयकार्ड पाठवितात. त्यानंतर हेरगिरीसाठी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड लागेल अशी धमकी देतात. त्यामुळे नागरिक घाबरतात. गुन्हेगारांकडून आता एआयचादेखील वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आपली काहीही चूक नसल्याचे नागरिकांना माहीत असताना त्यांनी न घाबरता थेट सायबर सेलकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइम