शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

लुडो किंगनंतर विद्यार्थ्यांना आता ‘पबजी गेम’चे वेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 13:50 IST

आॅनलाईन मोबाईल गेमने जिल्ह्यातल्या खापरखेडा येथील तरुणाई आहारी गेली आहे. यातच आता पबजी या आॅनलाईन गेमचे तरुणाईला व्यसनच जडले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन गेमिंगच्या आहारी नागपूर ग्रामीण भागातील तरुणाई

अरु ण महाजन।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅनलाईन मोबाईल गेमने जिल्ह्यातल्या खापरखेडा येथील तरु णाई आहारी गेली आहे. पूर्वी मोबाईलवर आॅनलाईन कॅण्डी क्र श, पोकोमन हा गेम खेळला जायचा. हे गेम आताही खेळले जात असले तरी लुडो किंग हा गेम आल्याने कॅण्डी क्र श, पोकोमनची क्र ेझ कमी झाली. ‘लुडो किंग’ वर जुगार ही खेळला जातो यातच आता पबजी या आॅनलाईन गेमने एन्ट्री केली. तरु णाईला याचे व्यसनच जडले.पबजी हा गेम खूप भुरळ पाडणार असाच आहे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, अनेक नोकरदार वर्ग फावल्या वेळात गेम खेळताना दिसत आहेत. काही मुले तर खाणेपिणे विसरून तासन्तास हा गेम खेळत बसतात. झोप विसरून रात्री उशिरापर्यंत हा गेम खेळला जात असल्याचे दिसून आले आहे.हल्ली मोबाईल डेटा अतिशय स्वस्तात उपलब्ध असल्याने गल्लोगल्ली मोबाईल आडवा धरून कानात हेडफोन घालून मुले, मुली आणि काही ज्येष्ठ मंडळीही हा गेम खेळताना दिसतात. परिणामी काही विद्यार्थी परीक्षेच्या कालावधीतही अभ्यासाकडे दुर्लक्ष करून गेम खेळत असल्याने इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षातील कामठी येथील विद्यार्थी नापास झाला.मुख्य म्हणजे हा गेम खेळता खेळता अनेकजण त्यात इतके गुंग होत आहेत की आजूबाजूला काय घडत आहे, याचा अंदाज त्यांना येत नाही. मुलांची बिघडणारी मानसिकता आणि ढासळत्या आरोग्याला आॅनलाईन गेम कारणीभूत ठरतात. या गेममुळे परिसरातील मुलांचा हट्टीपणा वाढत चालला आहे.आकर्षक व्हिज्युअल्स, मारधाड आणि अ‍ॅक्शनमुळे हा गेम सध्या येथील तरु णाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मुळात हा खेळ १८ वर्षावरील मुलांसाठीच आहे. पण त्यापेक्षा कमी वयाची मुलेही हा गेम जास्त खेळत आहे. या लहान मुलांमध्ये परिसरातील इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अधिक आहे. या मारधाडीच्या खेळामुळे मुलांमध्ये आक्र मक स्वभाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. अन्यथा मुलांना लवकरच मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारास नेण्याची पाळी येऊ शकते.या गेममध्ये असलेल्या मारामारीचे अनुकरण खऱ्या आयुष्यातही करण्याची मानसिकता मुलांमध्ये तयार होते. अशी परिस्थिती सध्या खापरखेडा येथे आहे. मारधाडीचे बरेचसे अल्पवयीन आरोपीची नोंद खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये आहे, हे विशेष.

टॅग्स :MobileमोबाइलStudentविद्यार्थी