शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

स्वातंत्र्यानंतरही आदिवासींवर अन्यायच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:16 IST

ब्रिटिशांनी वन विभाग स्थापन करून आदिवासींचे अधिकार हिरावले आणि त्यांच्यावरील अन्यायाचे सत्र सुरू झाले. भारत स्वतंत्र झाला, परंतु आदिवासींवरील हा अन्याय मात्र कायम राहिला.

ठळक मुद्देजागतिक आदिवासी अधिकार दिवस : फेलिक्स पॅडेल यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रिटिशांनी वन विभाग स्थापन करून आदिवासींचे अधिकार हिरावले आणि त्यांच्यावरील अन्यायाचे सत्र सुरू झाले. भारत स्वतंत्र झाला, परंतु आदिवासींवरील हा अन्याय मात्र कायम राहिला. स्वातंत्र्यानंतर आजही आदिवासींचे अधिकार हिरावले जात असून, त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. विकासाच्या नावावर जल,जंगल, जमीन नष्ट केली जात आहे, असे प्रतिपादन मानव उत्क्रांतीवादाचे जनक डार्विन यांचे पणतू आणि मानववंश शास्त्रज्ज्ञ डॉ. फेलिक्स पॅडेल यांनी येथे केले.आदिवासी समाजातील देशभरातील विविध सामाजिक संस्थांच्या एकीकृत मंच असलेल्या आदिवासी समन्वय मंच, अ.भा.आदिवासी परधान समाज संघटन, आदिवासी विद्यार्थी संघ आणि विविध आदिवासी संघटनांच्यावतीने अकरावा जागतिक आदिवासी अधिकार दिवसानिमित्त बुधवारी धंतोली येथील बचत भवन सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पॅडेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री खा. फग्गनसिंह कुलस्ते, राजस्थानचे माजी मंत्री महेंद्रजितसिंग मालविया, ओडिशाचे आमदार भोला मुंडारी, प्रभू टोकिया, अशोक बाबुल, साधना मीना, राजमाता राज राजेश्वरी, मुकेश बिरवा, आनंदराव कोवे, अमित कोवे, दिनेश मडावी, शिव भानुसिंग मंडलोई, इंदिरा मरकाम, मुकुंदा उईके आदी व्यासपीठावर होते.डॉ. पॅडेल म्हणाले, जल, जमीन, जंगल नष्ट केले जात आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींना हटविले जात आहे. आदिवासी आजही शिक्षणात मागे आहेत; कारण स्वातंत्र्यानंतर त्यांची संस्कृती व भाषा ही शाळेत उपलब्धच करून देण्यात आलेली नाही. देशभरातील आदिवासी आपल्या अधिकारासाठी लढत आहेत. देशात विविध ठिकाणी आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. परंतु या आंदोलनाला विकास विरोधी आंदोलन ठरविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी डॉ. पॅडेल यांनी ओडिशातील आदिवासी भाषेतील एक गीतही व्हायोलिनवर सादर केले. अशोक चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शांतिकर वसावा यांनी संचालन केले. एच.सी. माथे यांनी आभार मानले.ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाबद्दल आदिवासींची मागितली जाहीर माफीआदिवासी समाजावर जगभरात अन्याय केला जात आहे. आॅस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोठे मन दाखवून त्यांच्या देशात आदिवासींवर झालेल्या अन्यायाबाबत जाहीर माफी मागितली. भारतातील आदिवासींवर ब्रिटिशांनी अन्याय केला. त्यांच्या भांडवलवादी धोरणामुळेच आदिवासींवर अन्याय झाला. आजही तो अन्याय सुरू आहे, त्यामुळे एक ब्रिटिश नागरिक या नात्याने मी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागत असल्याचे डॉ. फेलिक्स पॅडेल यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले.देशभरातील आदिवासींनी एकजूट व्हावेयावेळी माजी मंत्री खा. फग्गनसिंह कुलस्ते यांनी आदिवासींनी आपल्या अधिकारांसाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. देशभरातील आदिवासी एकत्र आले तर त्यांचे अधिकार कुणीही हिरावू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दिनेश मडावी यांनी सुद्धा आदिवासींनी आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन केले. राजमाता राजेश्वरी, महेंद्रजित सिंग मालविया, भोला मुंडारी, प्रभू टोकीया,आदींनीही आपले विचार व्यक्त केलेआदिवासी भाषा-संस्कृतीचे रक्षण व्हावेआदिवासी भाषा आणि संस्कृती ही अतिशय जुनी व समृद्ध आहे. आदिवासीतील काही शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा आलेले आहेत. परंतु ही भाषा आणि संस्कृती नष्ट होत चालली आहे, त्याचे रक्षण करण्याची गरज आहे, असे डॉ. फेलिक्स पॅडेल म्हणाले.